Home रत्नागिरी तुकडे बंदी कायद्यात सुधारणा करून करण्याबाबत आमदार सदाभाऊ खोत यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घेतली भेट

तुकडे बंदी कायद्यात सुधारणा करून करण्याबाबत आमदार सदाभाऊ खोत यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घेतली भेट

0
तुकडे बंदी कायद्यात सुधारणा करून करण्याबाबत आमदार सदाभाऊ खोत यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घेतली भेट

महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध व तुकडेजोड अधिनियम 1948 अंतर्गत सुधारणा करून घरकुल मंजूर असलेल्या व्यक्तींना गुंठ्यामध्ये जमीन खरेदीची परवानगी दिली आहे. मात्र ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना घरकुल मंजूर नसले तरी निवासासाठी लहान तुकड्यांची जमीन घेण्याची आवश्यकता आहे, परंतु सद्य कायद्यामुळे त्यांना जमीन खरेदी करता येत नाही.

म्हणून ग्रामीण भागातील घरकुल नसलेल्या पात्र नागरिकांनाही घरासाठी आवश्यक तुकड्यांमध्ये जमीन खरेदीची परवानगी कायदेशीररित्या देण्यासाठी तुकडे बंदी कायद्यात तातडीने सुधारणा करण्यात यावी, याबाबत आज अधिवेशनादरम्यान आमदार सदाभाऊ खोत यांनी महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांची भेट घेतली. त्यांनी या विषयावर सकारात्मकता दाखवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here