संगमेश्वरतौकीर बागलकोटे यांचे शालांत परिक्षेत उज्ज्वल यश.

तौकीर बागलकोटे यांचे शालांत परिक्षेत उज्ज्वल यश.

संगमेश्वर तालुक्यातील कड़वई येथील महाराष्ट्र उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स चा विद्यार्थी कुमार तौकीर तन्वीर बागलकोटे याने २०२५ सालच्या इयत्ता १० वी (SSC) परीक्षेत ९२.८०% गुण मिळवून शाळेच्या शैक्षणिक यशात मोलाची भर घातली आहे.तसेच आपली आई नुज़हत बागलकोटे व वडील तन्वीर बागलकोटे चे नाव उज्ज्वल केले आहे.तौकीरने नियमित अभ्यास, शिक्षकांचे मार्गदर्शन, आणि पालकांच्या प्रेरणेमुळे हे यश संपादन केले आहे. त्याच्या या घवघवीत यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री. कारीगर सर, सर्व शिक्षकवृंद, संस्थेचे अध्यक्ष श्री. सादीक काजी व सर्व पदाधिकारी, जमाअतुल मुस्लिमीन कडवईचे अध्यक्ष आणि सदस्य, तसेच ग्रामस्थांनी त्याचे हार्दिक अभिनंदन केले आहे व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
तौकीरने आपल्या यशाचे श्रेय पालकांचे आशीर्वाद, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःच्या सातत्यपूर्ण मेहनतीला दिले आहे.
त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Breaking News

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ‘रन अँड राइड’ ; २०० हून अधिक धावपटूंचा सहभाग

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ‘रन अँड राइड’ ; २०० हून...

पारस बालभवनातील चिमुकल्यांसोबत जी.के.एस. महाविद्यालयाचे रक्षाबंधन उत्साहात संपन्न

पारस बालभवनातील चिमुकल्यांसोबत जी.के.एस. महाविद्यालयाचे रक्षाबंधन उत्साहात संपन्न खडवली(शांताराम गुडेकर...