रत्नागिरीदुष्काळ जाहीर होताच आमदार किरण उर्फ भैय्या सामंत ॲक्शन मोडमध्ये ! राजापूरच्या...

दुष्काळ जाहीर होताच आमदार किरण उर्फ भैय्या सामंत ॲक्शन मोडमध्ये ! राजापूरच्या पाणीटंचाईचा घेतला आढावा

दुष्काळ जाहीर होताच आमदार किरण उर्फ भैय्या सामंत ॲक्शन मोडमध्ये ! राजापूरच्या पाणीटंचाईचा घेतला आढावा–

वनराई बंधाऱ्यांवर भर देण्याचे निर्देश; पाणीटंचाई कृती आराखड्याचे प्रस्ताव तीन ते चार दिवसांत सादर करण्याच्या सूचना

👉राज्य शासनाने राजापूर तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश केल्यानंतर संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी आमदार किरण ऊर्फ भैय्या सामंत यांनी प्रशासनाची आढावा बैठक घेतली. राजापूर पंचायत समितीच्या किसान भवनात झालेल्या या बैठकीत तालुक्यातील पाणीपुरवठ्याची परिस्थिती, उपलब्ध पाणीसाठा आणि आगामी काळातील संभाव्य टंचाईवर मात करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

तालुक्यातील नागरिकांना भविष्यात पाणीटंचाईचा त्रास सहन करावा लागू नये, यासाठी आतापासूनच नियोजनबद्ध पावले उचलण्याची आवश्यकता आमदार सामंत यांनी अधोरेखित केली. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा साठा वाढविण्यासाठी जास्तीत जास्त वनराई बंधारे उभारण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

गावनिहाय कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश

पाणीटंचाई निवारणासाठी ग्रामपातळीवर आवश्यक कामांची यादी तयार करून त्यांचे प्रस्ताव पुढील तीन ते चार दिवसांत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. या प्रस्तावांच्या आधारे तालुक्याचा पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे.

बैठकीत धरणांमधील पाणीसाठा, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची कामे, कृषी विभागाच्या उपाययोजना आणि जिल्हा परिषद कृषी विभागाच्या कामांचा आढावा घेण्यात आला. सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी वेळेत उपाययोजना राबवाव्यात, असे आवाहन करण्यात आले.

शेतीच्या नुकसानीच्या पंचनाम्यांचाही आढावा

कमी पावसामुळे भातशेतीवर झालेल्या परिणामांचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. तहसीलदार विकास गंबरे यांनी शेतीच्या नुकसानीच्या पंचनाम्यांबाबत माहिती दिली.

या बैठकीला पंचायत समिती सभापती नंदिनी कदम, तहसीलदार विकास गंबरे, गटविकास अधिकारी रोहित कुंभार, माजी विधान परिषद सदस्य राजन तेली, राजापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमित यादव यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामसेवक आणि विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

राजापूर तालुक्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून पाणीटंचाई निवारणासाठी आवश्यक उपाययोजना वेळेत पूर्ण करण्यावर या बैठकीत भर देण्यात आला.

Breaking News

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना’त गुहागरच्या खामशेत ग्रामपंचायतीचा राज्यात गौरव

'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना'त गुहागरच्या खामशेत ग्रामपंचायतीचा राज्यात...