रत्नागिरीदेशाचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकाधिक...

देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकाधिक वापर करण्याचे केलेले आवाहन स्वीकारत आज भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री. श्री. रवींद्र दादा चव्हाण यांच्या समवेत रत्नागिरी साठीचा हा प्रवास वंदे भारत एक्सप्रेसने करत आहोत

देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकाधिक वापर करण्याचे केलेले आवाहन स्वीकारत आज भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री. श्री. रवींद्र दादा चव्हाण यांच्या समवेत रत्नागिरी साठीचा हा प्रवास वंदे भारत एक्सप्रेसने करत आहोत.

सार्वजनिक वाहतूक ही केवळ प्रवासाची सुविधा नसून पर्यावरण संरक्षण, इंधन बचत, वाहतूक कोंडी कमी करणे आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी वेळोवेळी दिलेल्या या संदेशाचा स्वीकार करत सार्वजनिक वाहतुकीच्या वापराला प्रोत्साहन देणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे.

वंदे भारतसारख्या आधुनिक, वेगवान आणि अत्याधुनिक रेल्वे सेवांमुळे देशातील पायाभूत सुविधांमध्ये मोठे परिवर्तन घडून आले असून, प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी आणि कार्यक्षम झाला आहे. ‘विकसित भारत’च्या दिशेने वाटचाल करताना अशा सार्वजनिक सुविधांचा जास्तीत जास्त वापर करणे ही काळाची गरज आहे.

या प्रवासादरम्यान संघटनात्मक विषय, राज्यातील विविध घडामोडी तसेच आगामी कार्यक्रमांबाबत चर्चा करण्याची संधी मिळाली.

यावेळी प्रदेश सरचिटणीस आमदार श्री. योगेश सागर व प्रदेश चिटणीस आमदार श्री. प्रशांत ठाकूर हे देखील सोबत होते. अनिकेत पटवर्धन पी.ए.रविद्र चव्हाण

Breaking News