रत्नागिरीपालकमंत्री डॉ उदय सामंत यांच्या रत्नागिरी येथील बालेकिल्ल्यात भाजप ने केले जबरदस्त...

पालकमंत्री डॉ उदय सामंत यांच्या रत्नागिरी येथील बालेकिल्ल्यात भाजप ने केले जबरदस्त शक्तीप्रदर्शन

पालकमंत्री डॉ उदय सामंत यांच्या रत्नागिरी येथील बालेकिल्ल्यात भाजप ने केले जबरदस्त शक्तीप्रदर्शनतुर्त तरी बाळासाहेब माने यांना भाजप मध्ये प्रवेश नाही.. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी डायरेक्ट सांगुनच टाकले
👉 पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या रत्नागिरी येथील बालेकिल्ल्यात भारतीय जनता पार्टीने प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी बैठक घेऊन एक प्रकारे जबरदस्त शक्तीप्रदर्शन केले असल्याचे दिसून आले आहे.. यावेळी अनेकांनी रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजप आता अधिक ताकदवान बनण्यासाठी काम करीत असल्याचे बोलले जात आहे..माजी आमदार बाळासाहेब माने हे आज भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करतील असे सर्वांना वाटत होते..

परंतु रवींद्र चव्हाण यांनी त्यांना पक्षात घेतले जाणार नसल्याचे सांगितले आहे..
या प्रसंगी विधान परिषद आमदार प्रमोद जठार, निरंजन डावखरे, माजी आमदार विनय नातू, आमदार प्रशांत ठाकूर, राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, वैभव खेडेकर, ॲड. दीपक पटवर्धन, माजी आमदार सूर्यकांत दळवी, रत्नागिरीचे उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, आदी
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Breaking News

सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक रुपेश चव्हाण निर्मित ‘रंग दे’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक रुपेश चव्हाण निर्मित ‘रंग दे’ गाणे...

सामान्य प्रशासन विभागाचे विभाजन माहिती व जनसंपर्क, राजशिष्टाचार दोन स्वतंत्र विभाग

सामान्य प्रशासन विभागाचे विभाजनमाहिती व जनसंपर्क, राजशिष्टाचार दोन स्वतंत्र...