रत्नागिरीनंदुरबारच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा

नंदुरबारच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा

नंदुरबारच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा–

👉 राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी नंदुरबार जिल्हा गुंतवणूक परिषदेत उद्योजकांशी संवाद साधला. जिल्ह्यातील औद्योगिक संधी, गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीच्या विविध शक्यतांवर यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सविस्तर चर्चा केली.

या परिषदेत १२३ सामंजस्य करार (MoU) झाले असून, त्यातून ₹५,००४ कोटींची गुंतवणूक प्रस्तावित झाली आहे. या गुंतवणुकीतून ७,७७८ रोजगाराच्या संधी निर्माण होणे अपेक्षित आहे. विशेषतः वस्त्रोद्योग क्षेत्रात ₹४,७८७ कोटींची गुंतवणूक प्रस्तावित झाली आहे, असे यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हटले.

यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव श्री. पी. अनबगलन, सहसंचालक उद्योग श्रीमती वृषाली सोने, नंदुरबारचे जिल्हाधिकारी श्री. अपार गोगटे, एमआयडीसीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शंकर बर्गे, नंदुरबार औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष श्री. नरेंद्र अग्रवाल, मैत्रीचे नोडल अधिकारी श्री. रविराज इळवे, GM DIC श्री. निलेश गायकवाड यांच्यासह जिल्ह्यातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Breaking News

‘चला वापरूया सौर ऊर्जा’! सावर्डे विद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

‘चला वापरूया सौर ऊर्जा’! सावर्डे विद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शनसावर्डे :...

गोवा शिपयार्डचा अभ्यास; सिंधुदुर्गात जहाजबांधणीला नवी दिशा

गोवा शिपयार्डचा अभ्यास; सिंधुदुर्गात जहाजबांधणीला नवी दिशा! मंत्री नितेश राणे...