रत्नागिरीपवन तलाव, चिपळूण येथे रत्नागिरी प्रीमिअर लीग २०२६ अंतर्गत भव्य डे-नाईट टेनिस...

पवन तलाव, चिपळूण येथे रत्नागिरी प्रीमिअर लीग २०२६ अंतर्गत भव्य डे-नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला आमदार किरण सामंत यांची भेट

पवन तलाव, चिपळूण येथे रत्नागिरी प्रीमिअर लीग २०२६ अंतर्गत भव्य डे-नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला आमदार किरण सामंत यांची भेट–
👉🏻चिपळूण तालुक्यातील पवन तलाव येथे रत्नागिरी प्रीमियर लीग 2026 अंतर्गत आयोजित भव्य डे-नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला आमदार किरण सामंत यांनी उत्साहपूर्ण भेट दिली.
या प्रसंगी आमदार सामंत यांनी खेळाडूंशी संवाद साधत त्यांचे कौतुक केले. ग्रामीण भागातील युवकांमध्ये क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी अशा स्पर्धा अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धेच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल आयोजकांचेही त्यांनी अभिनंदन केले.
यावेळी स्थानिक नागरिक, क्रीडाप्रेमी आणि युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. डे-नाईट स्पर्धेमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, खेळाडूंनीही उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
आमदार किरण सामंत यांनी भविष्यातही अशा क्रीडा उपक्रमांना आपला पाठिंबा राहील, असे आश्वासन देत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी प्रथमेश पवार, युवराज कुरूप आणि रितेश घाग यांनी घेतलेली मेहनत खरोखरच कौतुकास्पद आहे.
क्रिकेट हा फक्त खेळ नाही, तर संघभावना, शिस्त आणि संयम शिकवणारा एक सुंदर प्रवास आहे.

Breaking News

धामणसे गावात २०० नारळ रोपांचे वितरण

धामणसे गावात २०० नारळ रोपांचे वितरण 🔹श्री रत्नेश्वर ग्रंथालय; तीन...