पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या तत्परतेने २३ विद्यार्थ्यांचा ‘नासा’ दौरा ठरला निर्विघ्न;

0
6

पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या तत्परतेने २३ विद्यार्थ्यांचा ‘नासा’ दौरा ठरला निर्विघ्न;

ऐनवेळी उद्भवलेला पासपोर्टचा पेच अवघ्या काही तासांत सुटला! जिल्हा परिषद रत्नागिरीची मुलांचे अमेरिका प्रवासासाठी यशस्वी उड्डाण

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्हा परिषद शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या अमेरिकेमधील ‘नासा’ (NASA) अभ्यास दौऱ्यावर ऐनवेळी आलेले मोठे विघ्न राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री. उदयजी सामंत साहेब यांच्या तत्पर हस्तक्षेपामुळे टळले. १२ डिसेंबर रोजी रात्री १०.३० च्या विमानाने अमेरिकेला रवाना होणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या पासपोर्ट वितरणात तांत्रिक नियमामुळे निर्माण झालेली मोठी अडचण पालकमंत्र्यांनी अवघ्या काही तासांत मार्गी लावली आणि सर्व विद्यार्थ्यांचे यशस्वी उड्डाण झाले.

नेमकी काय अडचण आली होती?

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सलग चौथ्या वर्षी २६ विद्यार्थी (१४ मुली व १२ मुले) आणि अधिकारी १२ डिसेंबर रोजी रात्री १०.३० च्या फ्लाईटने अमेरिकेला रवाना झाले. या संपूर्ण दौऱ्याची विमानाची तिकिटे, अमेरिकेतील हॉटेल बुकिंग आणि नासामधील सर्व नियोजन पूर्ण झाले होते.
१२ डिसेंबर रोजी सकाळी व्हिसा मंजूर झालेले पासपोर्ट ताब्यात घेण्यासाठी विद्यार्थी व अधिकारी संबंधित केंद्रावर गेले असता, “नवीन नियमानुसार प्रत्यक्ष पालक सोबत असल्याशिवाय अल्पवयीन मुलांचे पासपोर्ट दिले जाणार नाहीत,” असे सांगण्यात आले. याआधीच्या तीनही दौऱ्यांमध्ये असा कोणताही नियम नसल्याने प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला. दौऱ्यातील २३ मुलांचे पालक तात्काळ तिथे उपलब्ध नसल्याने संपूर्ण दौराच धोक्यात येतो की काय, अशा चिंतेने विद्यार्थी व अधिकारी हवालदिल झाले होते.

पालकमंत्र्यांची ‘क्विक अॅक्शन’ आणि सुटकेचा निश्वास
ही गंभीर बाब तातडीने पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या कानावर घालण्यात आली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ना. सामंत यांनी क्षणाचाही विलंब न लावता सूत्रे हलवली. त्यांनी तात्काळ ‘व्हीएफएस ग्लोबल’ (VFS Global) कार्यालयाशी संपर्क साधून त्यांच्यामार्फत अमेरिकन दूतावासाकडे (US Embassy) विशेष परवानगीसाठी (Special Approval Request) तातडीचा अर्ज सादर करवून घेतला.
ना. सामंत यांच्या पाठपुराव्यामुळे अमेरिकन दूतावासानेही या विनंतीला तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत विशेष परवानगी दिली. परिणामी, अवघ्या काही तासांतच सर्व विद्यार्थ्यांचे व्हिसा स्टॅम्प झालेले पासपोर्ट प्रशासनाच्या ताब्यात सुखरूप मिळाले.
या यशस्वी मध्यस्थीमुळे अधिकारी, विद्यार्थी आणि पालकांनी मोठा सुटकेचा निश्वास टाकला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे परदेश वारीचे आणि अंतराळ संशोधनाचे स्वप्न भंगू न देता, पालकमंत्र्यांनी दाखवलेल्या या संवेदनशील आणि तत्पर कार्यशैलीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here