रत्नागिरीपोस्ट विभागाचे 1 व 2 एप्रिल रोजी व्यवहार बंद

पोस्ट विभागाचे 1 व 2 एप्रिल रोजी व्यवहार बंद

रत्नागिरी, (जिमाका) :- आर्थिक वर्ष 2025-26 हे 31 मार्च रोजी संपत आहे. सरत्या आर्थिक वर्षाच्या दृष्टीने काही कामकाज वर्ष अखेर करणे आवश्यक असल्याने 1 एप्रिल व 2 एप्रिल 2026 हे दोन दिवस व्यवहार बंद दिवस म्हणून पोस्ट विभागाने घोषित केले आहेत.
या दोन दिवशी सर्व सीबीएस पोस्ट ऑफिसमध्ये काउंटर वर कोणतेही पीओएसबी चे व्यवहार केले जाणार नाहीत. तसेच डीओपी ई बँकिंग/एम बँकिंग, आयपीपीबी-पीओएसबी स्वाईप इन व स्वाईप आऊट या सर्व सुविधा 1 व 2 एप्रिल 2026 दोन दिवशी उपलब्ध असणार नाहीत पोस्ट ऑफिसच्या सर्व ग्राहकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन अधीक्षक डाकघर रत्नागिरी यांनी केले आहे.

Breaking News

एम. एन. जोशी स्कूलमध्ये अटलबिहारी वाजपेयी स्मृती सभागृहाचे नामकरण

रत्नागिरी : भाजपा प्रदेशाध्यक्ष, आमदार रविंद्र चव्हाण यांच्या प्रेरणेतून...

रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला गौरव

👉१५० दिवसांच्या ई- गव्हर्नन्स सुधारणा' कार्यक्रमातंर्गत निवडलेल्या उत्कृष्ट कार्यालयांना...