Home रत्नागिरी प्रभाग १५ मध्ये नगरसेवक चषक २०२६ चे दिमाखात उद्घाटन

प्रभाग १५ मध्ये नगरसेवक चषक २०२६ चे दिमाखात उद्घाटन

0
प्रभाग १५ मध्ये नगरसेवक चषक २०२६ चे दिमाखात उद्घाटन

🔴प्रभाग क्रमांक १५ मधील युवा फ्रेंड्स तेली आळी यांच्या वतीने आयोजित व भारतीय जनता पार्टी पुरस्कृत नगरसेवक चषक २०२६ स्पर्धेचे उद्घाटन दिनांक ५ जानेवारी २०२६ रोजी उत्साहात पार पडले.

🔴या स्पर्धेचे उद्घाटन महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष व रत्नागिरी नगरपरिषद नगरसेविका वर्षा परशुराम ढेकणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष दादा ढेकणे, नगरसेवक नितीन जाधव नगरसेवक संदीप सुर्वे, विक्रम जैन, सचिन गांधी सुरेंद्र लांजेकर, माजी नगरसेविका सौ. सत्यवती बोरकर, सौ. वैभवी शिवलकर, सत्यवान बोरकर, सत्यवान लांजेकर, अनिल शिवलकर, सौ. मधुरा ढेकणे, प्रभाकर ढेकणे, राहुल रसाळ विनय गोवेकर जागा मालक पप्पू चवंडे तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

🔴उद्घाटन समारंभास विविध संघांचे खेळाडू, क्रीडाप्रेमी व मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. मान्यवरांनी खेळाडूंना शुभेच्छा देत क्रीडास्पर्धेमुळे युवकांमध्ये शिस्त, संघभावना व आरोग्याची जाणीव वाढते, असे मत व्यक्त केले

🔴या स्पर्धेसाठी युवा फ्रेंड्स तेली आळी यांनी उत्कृष्ट नियोजन केले. तसेच सौ वर्षा परशुराम ढेकणे यांनी संपूर्ण टीमला शुभेच्छा देत भविष्यातही असे उपक्रम राबविण्याचे आश्वासन दिले.

🔴यावेळी शहराध्यक्ष दादा ढेकणे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या स्पर्धेमुळे प्रभागातील युवकांना आपली क्रीडास्पर्धात्मक गुणवत्ता दाखवण्याची संधी मिळणार असून, नवे खेळाडू घडण्यास मदत होणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here