संगमेश्वरफासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू; वन विभागाकडून गुन्हा दाखल

फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू; वन विभागाकडून गुन्हा दाखल

फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू; वन विभागाकडून गुन्हा दाखल

कडवई : संगमेश्वर तालुक्यातील मौजे तुरळ-हारेकरवाडी येथे फासकीत अडकून एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वन विभागाने गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. मौजे तुरळ येथून माखजनकडे जाणाऱ्या स्थानिक सीमावर्ती रस्त्यालगत उजव्या बाजूस असलेल्या खैराच्या झाडाला लावलेल्या फासकीत बिबट अडकून मृतावस्थेत असल्याची माहिती तुरळ-हारेकरवाडीचे पोलीस पाटील यांनी शुक्रवारी सकाळी वन विभागाला दिली. माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी आवश्यक साहित्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पाहणीअंती बिबट्या खैराच्या झाडाला लावलेल्या फासकीत अडकून लोंबकळत असल्याचे निदर्शनास आले. वन विभागाने मृत बिबट्याला फासकीतून बाहेर काढून फासकीसह संबंधित साहित्य जप्त केले. मृत बिबट्याचे सर्व अवयव सुस्थितीत असल्याचे आढळून आले. यानंतर पशुधन विकास अधिकारी, कडवई यांच्या उपस्थितीत मृत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले. आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून सर्व अवयवांसह मृत बिबट्याची विल्हेवाट लावण्यात आली. या प्रकरणी वनपाल, संगमेश्वर-देवरुख यांनी प्रकरण नोंद करून वन्यप्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी परिक्षेत्र वनाधिकारी विक्रम गुरव, परिमंडळ वनाधिकारी सागर गोसावी, वनरक्षक सुप्रिया काळे, सूरज तेली, सहयोग कराडे तसेच पंच उपस्थित होते. ही कारवाई विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. दरम्यान, वन्यप्राणी अडचणीत आढळल्यास किंवा अशा प्रकारच्या घटना घडल्यास नागरिकांनी वन विभागाच्या टोल-फ्री क्रमांक १९२६ अथवा ९०९६५७८७६१ वर तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन वन विभागाने केले आहे.

Breaking News

H555 Speed Blackjack Tables, Limits, and Providers

H555 Speed Blackjack Tables, Limits, and ProvidersH555’s speed blackjack...

Razor Returns Review and Play Strategy for Slots Fans

Razor Returns Review and Play Strategy for Slots FansRazor...