रत्नागिरीभाट्ये समुद्रकिनारी १ टन निर्माल्य संकलित; गांडूळ खतासाठी वापर होणार

भाट्ये समुद्रकिनारी १ टन निर्माल्य संकलित; गांडूळ खतासाठी वापर होणार

भाट्ये समुद्रकिनारी १ टन निर्माल्य संकलित; गांडूळ खतासाठी वापर होणार
रत्नागिरी: गौरी-गणपती विसर्जनाच्या निमित्ताने भाट्ये समुद्रकिनारी रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिड टाऊन, इनर व्हील क्लब, मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, नारळ संशोधन केंद्र आणि भाट्ये ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने निर्माल्य संकलन उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. भाविकांच्या १००% प्रतिसादामुळे सुमारे १ टन निर्माल्य एकत्र करण्यात आले.
संकलित निर्माल्याचे सेंद्रिय व असेंद्रिय वर्गीकरण करण्यात आले असून, फुले व फळांपासून नारळ संशोधन केंद्र येथे गांडूळ खत तयार केले जाणार आहे. गेल्या २९ वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात असून, यंदा केवळ दोनच भाविकांनी थर्माकोल वापरल्याचे समोर आले.
दरम्यान, भाविकांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा, तसेच फुलांच्या हारांमध्ये प्लास्टिकची कृत्रिम फुले वापरणे बंद करून पर्यावरणपूरक पिशव्यांचा वापर करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. संदीप करे, सौ. सुवर्णा चौधरी, ऋषिकेश भाटकर, डॉ. केतन चौधरी व बिपिनचंद्र गांधी यांनी परिश्रम घेतले. भाविकांच्या सहकार्याबद्दल आयोजकांनी आभार मानले आहेत.

Breaking News

Bankloc a {{brand_name}} casino és befizetés

A világ online gaming színvonalának egyik kulcsa a megbízható...