रत्नागिरीमहात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी
रत्नागिरी येथील एम. एस. नाईक प्राथमिक इंग्लिश मीडियम स्कूल येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५७ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी गांधीजींच्या जीवनकार्यावर भाषणे सादर केली. तसेच सत्य, अहिंसा, स्वच्छता, साधेपणा आणि बंधुभाव या गांधीजींच्या विचारांचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.
प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ आरिफा म्हालदार यांनी महात्मा गांधी यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाची माहिती तसेच त्यांच्या विचारांचा अंगीकार करून स्वच्छता राखणे, अहिंसेचा मार्ग स्वीकारणे आणि समाजासाठी चांगले कार्य करण्याचा संदेश दिला.
या कार्यक्रमास संस्थाध्यक्ष श्री. नोमान नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अकीब काझी, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. अशफाक नाईक यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.

Breaking News