Home रत्नागिरी महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक जडणघडणीत ग्रामीण जीवन, शेती आणि सहकार यांचे योगदान अत्यंत मोला चे राहिले आहे

महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक जडणघडणीत ग्रामीण जीवन, शेती आणि सहकार यांचे योगदान अत्यंत मोला चे राहिले आहे

0
महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक जडणघडणीत ग्रामीण जीवन, शेती आणि सहकार यांचे योगदान अत्यंत मोला चे राहिले आहे

महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक जडणघडणीत ग्रामीण जीवन, शेती आणि सहकार यांचे योगदान अत्यंत मोला चे राहिले आहे. या तिन्ही क्षेत्रांचे साहित्यिक, वैचारिक व अनुभवाधारित दर्शन घडवणारे तीन दिवसीय ग्रामीण-कृषी-सहकार मराठी साहित्य संमेलन २०२६ मांडकी-पालवण चिपळूण येथे संपन्न होत आहे. या संमेलनाच्या उद्‌घाटन सोहळ्यास राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदयजी सामंत उपस्थित होते.

कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था यांच्या वतीने हे संमेलन संस्थेच्या प्रशस्त क्रीडांगणावर संपन्न होत आहे. या संमेलनात ग्रामीण साहित्य, कृषी सुधारणा, सहकार चळवळ आणि कोकणातील सांस्कृतिक वारसा यावर आधारित विविध परिसंवाद, कवी संमेलन, ग्रंथदिंडी, पुस्तक प्रदर्शन, मुलाखती व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण जीवन, शेतकऱ्यांचे प्रश्न, सहकारातील मूल्ये आणि साहित्याच्या माध्यमातून समाजप्रबोधन या विषयांवर सखोल चर्चा होणार आहे.

उद्‌घाटन सोहळ्याला ना. उदयजी सामंत ह्यांच्या सोबत महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक व कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे, स्वागताध्यक्ष डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीचे कुलगुरू डॉ. संजय भावे, प्रमुख कार्यवाह डॉ. निखिल चोरगे, संयोजन समिती अध्यक्ष प्रकाश देशपांडे यांच्यासह साहित्यिक, कृषी तज्ज्ञ आणि सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here