Home रत्नागिरी मिऱ्या-नागपूर, मुंबई-गोवा मार्गाच्या कामाचीजिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केली पहाणी

मिऱ्या-नागपूर, मुंबई-गोवा मार्गाच्या कामाचीजिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केली पहाणी

0
मिऱ्या-नागपूर, मुंबई-गोवा मार्गाच्या कामाचीजिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केली पहाणी

रत्नागिरी, द (जिमाका)- जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी आज मिऱ्या-नागपूर, मुंबई-गोवा मार्गाच्या कामाची पाहणी केली. महामार्गाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी ठेकेदारांना सूचना देतानाच त्यांनी समस्याही जाणून घेतल्या.
राजापूर प्रांताधिकारी डाॕ जस्मीन, जीवन देसाई, तहसीलदार प्रियांका ढोले, राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता श्री कुलकर्णी, उपअभियंता कौशिक रहाटे, अनिल पाटील, प्रकल्प व्यवस्थापक प्रेमकुमार आदी उपस्थित होते.
कुवारबाव, आकाशवाणी, हातखंबा, पाली पूल, लांजा, कुडू , कुरणे आदी ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेषत्वाने आज भेट देवून पाहणी केली. लवकरात-लवकर काम सुरु करण्याबाबत ठेकेदारांना त्यांनी सूचना दिली. ते म्हणाले, काम गतिने करण्यासाठी नियोजन करावे. काही समस्या, अडचणी येत असतील त्या सोडवण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल. अधिक वेगाने काम करुन पूर्ण करण्यासाठी वेळेचेही नियोजन करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here