Home महाराष्ट्र मुंबई गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच‌.महाड येथे झाले भिषण अपघात…

मुंबई गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच‌.महाड येथे झाले भिषण अपघात…

मुंबई गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच‌.महाड येथे झाले भिषण अपघात…

महामार्ग प्राधिकरण उदासीन…

मुंबई गोवा महामार्गावरील महाड दरम्यान ट्रक आणि कारचे भीषण अपघात झाले असून यामध्ये जिवितहानी झाली नसली तरी तीन जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे. अजून पावसाळी हंगाम म्हणावा तसा सुरू झालेला नाही आणि त्या अगोदरच मुंबई गोवा महामार्गावर अपघात होण्यास सुरुवात झाली असल्याने वाहनधारकात भीतीचे वातावरण पसरले आहे. पंधरा दिवसापूर्वीच खेड येथील जगबुडी नदीत कार कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला होता यातून महामार्ग विभाग अद्याप तरी कोणताच धडा घेत नसल्याचे दिसून येत आहे मुंबई गोवा महामार्गावर अनेक ठिकाणे अशी आहेत जी सरळ सरळ अपघाताला निमंत्रण देतात परंतु शासन आणि प्रशासनाचे मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने वाहनांचे अपघात होत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here