👉रत्नागिरीत युवा सेनेत युवकांचा जाहीर प्रवेश- पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अनेकांनी केला जाहीर प्रवेश–
👉रत्नागिरी शहरातील विविध भागांतील युवकांनी राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नामदार उदयजी सामंत साहेब आणि मा. आमदार किरणजी सामंत साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत युवा सेनेत जाहीर प्रवेश केला आहे- या पक्षप्रवेशामुळे शहरातील युवा सेनेच्या संघटनात्मक बळात वाढ झाली आहे.
शहरातील प्रभाग क्रमांक १० मधील श्री. गौरव शिंदे यांच्या समवेत अनंत बसणकर, किरण खेडेकर, सुमित घोसाळकर, ऋषिकेश रसाळ आणि सूरज भोसले यांनी युवा सेनेत प्रवेश केला.
तसेच मानस गुरव यांच्या समवेत मानस शिवलकर, ऋग्वेद महाकाळ, रेहान बलबले, सचिन बेहेरे, यतीन नेवरेकर, आर्यन मसाये, आदित्य पवार आणि अहमद मुरादअली पाटणकर यांनी पक्षात प्रवेश केला.
याशिवाय अहमद मुरादअली पाटणकर यांच्या समवेत अफराज मुकादम, अरसलान हुनेरकर, रिजवान सनादी आणि एम. डी. सकलेन, तर श्रवण शिंदे यांच्या समवेत चिराग राठोड, श्रेयस मेस्त्री, ऋषिकेश रसाळ, अवधूत गवंडी आणि यज्ञेश चव्हाण आदी युवकांनी युवा सेनेत प्रवेश केला.*
हा पक्षप्रवेश शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. राहुलजी पंडित, उपशहर प्रमुख विकासजी पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख तुषारजी साळवी, युवासेना तालुकाप्रमुख हर्षराज पाटील तसेच नगरसेवक व युवासेना शहरप्रमुख अभिजित दुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी प्रथमेश साळवी, रोहित मायनाक, सर्वेश शेलार, दुर्वेश पांगम, शुभम साळवी, रितेश साळवी आदी उपस्थित होते.
या पक्षप्रवेशामुळे रत्नागिरी शहरात युवा सेनेच्या संघटनात्मक विस्ताराला चालना मिळणार असून, युवकांचा सहभाग वाढण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा उपक्रम ठरला आहे.
