Home रत्नागिरी रत्नागिरी तालुक्यात उबाठा गटाला भगदाड

रत्नागिरी तालुक्यात उबाठा गटाला भगदाड

0
रत्नागिरी तालुक्यात उबाठा गटाला भगदाड

कसोप व फणसोप ग्रामपंचायत सदस्यांचा मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश–

रत्नागिरी तालुक्यातील उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. कसोप व फणसोप ग्रामपंचायत सदस्यांनी मंत्री डॉ उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
ग्रामपंचायत सदस्यांनी व ग्रामस्थांनी मंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत शिवसेनेत प्रवेश केला.या प्रवेशामुळे शिवसेनेची ताकद या भागात अधिक बळकट झाली आहे. या प्रवेश सोहळ्याला मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
प्रवेश केलेल्या प्रमुख सदस्य व ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य रितेश रवींद्र साळवी, साक्षी सुदेश चौगुले, माजी सदस्य संजय उर्फ भाऊ तोडणकर, कसोप व कुर्ली ग्रामस्थ सुदेश उर्फ आबा चौगुले, नितिकेश फटकरे, मंगेश पावसकर, सुधीर चौगुले, गजानन शेडगे, नंदकुमार पानगले, रुपेश साळवी, गुरुप्रसाद साळवी, शुभम साळवी, ओंकार साळवी, भावेश गुरव, रवींद्र तोडणकर, राजन तोडणकर, सुदेश पानगले, उत्कर्षा साळवी, समृद्धी साळवी, स्नेहाकिंता भिसे, दिव्या माटल, ग्रंथाली ठीक, नानू पानगले, राहुल साळवी, सौरभ साळवी, संदीप साळवी, अनिल पानगले, श्रीधर चौगुले, रघुनाथ पानगले, पांडुरंग जाधव, राकेश ठीक, शिरीष पानगले, अनंत पाष्टे, राज तोडणकर, संदीप साळवी, प्रमोद साळवी, प्रतिमा साळवी, सुहासिनी नेवरेकर, आर्वी केदारी, सुचिता केदारी, पूजा जाधव, आणि इतर ग्रामस्थ.
तसेच, या प्रसंगी युवा सेना तालुका प्रमुख तुषार साळवी आणि बाबा साळवी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here