Home रत्नागिरी रत्नागिरी येथे जागतिक क्षयरोग दिन साजरा.दरवर्षी २४ मार्च हा जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो

रत्नागिरी येथे जागतिक क्षयरोग दिन साजरा.दरवर्षी २४ मार्च हा जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो

0
रत्नागिरी येथे जागतिक क्षयरोग दिन साजरा.दरवर्षी २४ मार्च हा जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो

.”होय आपण क्षयरोग निश्चित संपवू शकतो : प्रतिज्ञा करा,तरतूद करा ,सेवा द्या” हे या वर्षाचे घोषवाक्य आहे. दि. 24/03/2025 रोजी जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ महेंद्र गावडे यांचे प्रमुख उपस्थितीत जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी मुख्य वैदयकिय अधिकारी (ART) डॉ. रश्मी आठल्ये,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश शिरसाट, वैदयकिय अधिकारी डॉ. ज्योत्स्ना वाघमारे, जिल्हा क्षयरोग विभागाचे व जिल्हा रुग्णालयाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगतातून क्षयरोगाबद्दल माहिती दिली.
यावेळी क्षयरोग जनजागृती बाबत घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धा, निबंधस्पर्धा, चित्रकला स्पर्धा यामध्ये एकूण १२० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यात प्रविण्य मिळवलेल्या विध्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सन २०२४ मधील टी.बी. मुक्त ग्रामपंचायत मधील निवड झालेल्या प्रातिनिधिक स्वरूपात ग्रामपंचायत कापडगाव, झरेवाडी, पावस, टिके, टेंभ्ये यांच्या सरपंचांना प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह/ पदक देवून गौरविण्यात आले. तसेच जिल्हा रुग्णालयातील क्षयरोग कक्ष व बालरुग्ण कक्षात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.यानंतर परिचारिका महाविद्यालय व आरोग्य कर्मचारी यांच्या मार्फत रत्नागिरी शहरात क्षयरोग जनजागृती पर प्रभात फेरी काढण्यात आली.या प्रभातफेरीत सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी होते .जिल्हा रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात क्षयरोग जनजागृतीसाठी पथनाट्याचे आयोजन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here