Home रत्नागिरी रत्नागिरी शहराचा विकास करणे माझी जबाबदारी.पालक मंत्री उदय सामंत.

रत्नागिरी शहराचा विकास करणे माझी जबाबदारी.पालक मंत्री उदय सामंत.

0
रत्नागिरी शहराचा विकास करणे माझी जबाबदारी.पालक मंत्री उदय सामंत.

रत्नागिरी शहराचा विकास करणे ही माझी जबाबदारी आहे आणि ती पुर्ण करणारच अशी ग्वाही पालकमंत्री ना उदय सामंत यांनी दिली आहे. रत्नगिरी नगरपरिषद प्रभाग क्र. ५ मधील महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार शिल्पाताई सुर्वे, नगरसेवक पदाचे उमेदवार सौरभ मलुष्टे, पूजा पवार यांच्या प्रचारासाठी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे ऍक्टिव्हिटी सेंटर, साळवी स्टॉप व क्रांतीनगर येथे आयोजित सभेस शिवसेना उपनेते आणि राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत उपस्थित होते.

जनतेसाठी अविरत कार्य आपण करत आलो आहे. यापुढेही जनतेच्या कामांची परंपरा आणि विकासाचा निर्धार असाच अखंडपणे सुरूच राहणार आहे. तरी सर्वांनी महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देत सेवेची संधी द्यावी असे आवाहन मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल पंडित, भाजप जिल्हा समन्वयक दीपक पटवर्धन, शहराध्यक्ष बिपीन बंदरकर, सुदेश मयेकर, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व माता – भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here