Home रत्नागिरी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष म्हणून सुरज कुमार शेटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष म्हणून सुरज कुमार शेटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

0
राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष म्हणून सुरज कुमार शेटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष म्हणून सुरज कुमार शेटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही जबाबदारी माझ्यासाठी केवळ पद नसून रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासाची आणि युवकांच्या भवितव्याची शपथ आहे असे सुरज शेटे म्हणाले
दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. शशिकांत शिंदे तसेच पक्षाचे सरचिटणीस व प्रभारी फ्रंटल संघटना, आमदार श्री. रोहितदादा पवार यांच्या हस्ते, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार , राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महेबुब भाई शेख, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनीलदादा गव्हाणे व सोबत असलेल्या इतर मान्यवरांच्या उपस्थितीत अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या विश्वासाबद्दल मी पक्ष नेतृत्वाचा मनःपूर्वक ऋणी आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, युवकांना संघटित करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि तळागाळातील प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे सुरेश शेटे म्हणाले

पद्मविभूषण खासदार शरद पवार साहेबांनी दाखविलेला विकासाचा मार्ग, स्व. अजितदादा पवार यांची कामाची पद्धत आणि माझे वडील स्व. सुहास (कुमार) शेट्ये यांनी जपलेली समाजसेवेची परंपरा यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी कार्य करणार आहे.

रत्नागिरीच्या उज्ज्वल भविष्यासाठी, सुवर्णकाळ परत आणण्यासाठी आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या सन्मानासाठी माझे संपूर्ण समर्पण असेल.

आपण सर्वांचा विश्वास व भविष्यात मिळणारी साथ हीच माझी सर्वात मोठी ताकद आहे असे ही सुरज शेटे आपले भावना व्यक्त करताना म्हणाले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here