रत्नागिरीलोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त "लेखन प्रेरणा दिवस" नवनिर्माण...

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त “लेखन प्रेरणा दिवस” नवनिर्माण मध्ये साजरा करण्यात आला

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त “लेखन प्रेरणा दिवस” नवनिर्माण मध्ये साजरा करण्यात आला.
======——-======
रत्नागिरी :- नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या रत्नागिरी येथील एस. पी. हेगशेटये महाविद्यालय आणि नवनिर्माण कनिष्ठ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, येथे अण्णा भाऊ साठे जयंती निमित्त लेखन प्रेरणा दिन विविध उपक्रमणी उत्साहात साजरा करण्यात आला.

सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. हर्षदा शिऊडकर यांनी केले. त्यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यिक, सामाजिक आणि परिवर्तनवादी कार्याचा परिचय करून देत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.

या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. सचिन टेकाळे यांनी आपल्या प्रभावी, ओघवत्या आणि श्रोत्यांना खिळवून ठेवणाऱ्या वक्तृत्वशैलीत अण्णा भाऊ साठे यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व उलगडून सांगितले. त्यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनाचा प्रवास, साहित्यनिर्मिती आणि सामाजिक परिवर्तनासाठी केलेले कार्य विद्यार्थ्यांसमोर प्रेरणादायी पद्धतीने मांडले. अण्णा भाऊ साठे यांचा संघर्ष हा सामाजिक परिवर्तनाचा दीपस्तंभ असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना, “लेखक व्हा, वक्ते व्हा, समाजासाठी कार्य करा. माणूस एक दिवस जातो; मात्र त्याचे साहित्य, विचार आणि कार्य चिरंतन राहते. त्यामुळे समाजाला काहीतरी देत राहा,” असा प्रेरणादायी संदेश दिला.

या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गवाळे यांनी मनोगत व्यक्त करताना, त्यांनी अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे समाजातील वंचित, शोषित आणि कष्टकरी घटकांच्या जीवनाचे वास्तव दर्शन घडवणारे असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी वाचन, चिंतन आणि लेखनाची सवय जोपासून समाजाभिमुख साहित्यनिर्मिती करावी, असे आवाहन त्यांनी केले, विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला या उपक्रमांतून निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी विद्यार्थ्यांमध्ये लेखनाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी या उद्देशाने कथालेखन उपक्रम आयोजित करण्यात आला.
वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विविध कथाबीजे देवून त्या कथाबीजांच्या आधारे विद्यार्थ्यांनी कल्पकता, संवेदनशीलता आणि लेखनकौशल्याचा उत्कृष्ट आविष्कार घडवत दर्जेदार कथा लिहिल्या.

या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला,
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर विविध भाषांमध्ये प्रभावी भाषणे सादर केली.

इयत्ता १२ वी कला शाखेतील सना निंबाळ हिने “अण्णा भाऊ साठे यांचे सामाजिक कार्य” या विषयावर उर्दूमधून भाषण केले.

विधी कापडी हिने इंग्रजीमधून ‘अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य आणि योगदान ‘
या विषयावर प्रभावी विचार मांडले.

नायाब दरवे हिने हिंदीमधून “अण्णा भाऊ साठे : जीवन एवं सामाजिक कार्य” या विषयावर भाषण केले.
ऋचा पवार हिने अण्णा भाऊ साठे यांच्या सामाजिक कार्यावर मनोगत व्यक्त केले, तर प्रथम वर्ष कला शाखेतील राहिला मुकादम हिने इंग्रजी भाषेतून प्रभावी भाषण करून उपस्थितांची दाद मिळवली.

कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गवाळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे विभाग प्रमुख प्रा. सुकुमार शिंदे,कला शाखा विभागप्रमुख प्रा. वर्षा कुबल, राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख प्रा. सुशील साळवी, भूगोल विभागप्रमुख प्रा. डॉ. राजेंद्र कांबळे, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अश्विनी कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. निकिता नलावडे यांनी मानले.

अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेला ‘लेखन प्रेरणा दिन’ हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये साहित्यप्रेम, सामाजिक जाणीव, वाचन-लेखन संस्कृती आणि सर्जनशीलतेची प्रेरणा जागवणारा ठरला.
————===————

Breaking News

आषाढी एकादशीनिमित्त जिल्हा.परिषद. आदर्श मराठी शाळा वहाळ येथे दिंडी उत्साहात

आषाढी एकादशीनिमित्त जिल्हा.परिषद. आदर्श मराठी शाळा वहाळ येथे दिंडी...

रत्नागिरी येथील नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित नवनिर्माण हायस्कूलमध्ये शिक्षक प्रशिक्षण उत्साहात संपन्न

रत्नागिरी येथील नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित नवनिर्माण हायस्कूलमध्ये शिक्षक...