रत्नागिरीविद्यार्थ्यांना सक्षम करणे व गरजू घटकांना मदतीचा हात देणे, हेच झेप फाऊंडेशनेचे...

विद्यार्थ्यांना सक्षम करणे व गरजू घटकांना मदतीचा हात देणे, हेच झेप फाऊंडेशनेचे ध्येयः वर्षाताई ढेकणे

विद्यार्थ्यांना सक्षम करणे व गरजू घटकांना मदतीचा हात देणे, हेच झेप फाऊंडेशनेचे ध्येयः वर्षाताई ढेकणे

झेप फाउंडेशन संस्थेतर्फे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सन्मान

रत्नागिरी, : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविणे तसेच शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सक्षम करणे, समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देणे, हेच झेप फाऊंडेशन संस्थेचे ध्येय आहे, आजचा विद्यार्थी उद्याचा सक्षम नागरिक असून त्यांनी विविध स्पर्धा परीक्षेत उज्जल यश संपादन करून उच्च पदावर विराजमान व्हावे, असे प्रतिपादन रत्नागिरी नगरपरिषदेच्या नगरसेविका व झेप फाऊंडेशन या शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या कोषाध्यक्षा सौ. वर्षाताई परशुराम ढेकणे यांनी केले.

झेप फाउंडेशन रत्नागिरी(रजि.) या शैक्षणिक, सामाजिक संस्थेच्यावतीने दि. 27 सप्टें. 2026 रोजी रत्नागिरी शहरातील शाळांमध्ये इयत्ता 4 थी व 7 वी स्कॉलरशीप परिक्षेत गुणवत्ता यादीत झळकून शिष्यवृत्ती प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी सौ. वर्षाताई ढेकणे मान्यवर म्हणून बोलत होत्या, पुढे उपस्थित विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या, शैक्षणिक कार्यात काही अडचणी आल्यास झेप फाऊंडेशन संस्थेचे सदैव सहकार्य राहिल.

या कार्यक्रमाला डॉ. प्रा. शंकर जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर मान्यवरांमध्ये पटवर्धन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. वेल्हाळ, झेप फाउंडेशनचे अध्यक्ष परशुराम उर्फ दादा ढेकणे, प्रभाग क्रमांक 15 च्या भाजपा नगरसेविका व संस्थेच्या कोषाध्यक्षा सौ. वर्षाताई ढेकणे, संस्थेचे सचिव सुनील पवार, उपाध्यक्ष सचिन गांधी, सदस्य रुपेश खेडेकर, प्राजक्ता महादये, प्रणाली मेस्त्री उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष दादा ढेकणे यांनी व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्याचा परिचय सचिव सुनिल पवार यांनी करून दिला.

प्रमुख अतिथी डॉ. शंकर जाधव यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेशिवाय पर्याय नाही, यशस्वी होण्यासाठी प्रत्येक ठिकाणी परीक्षेला सामोरे जावे लागेल, त्यासाठी विद्यार्थ्यांनी अवांतर वाचन केले पाहिजे. विद्यार्थ्याना त्यांच्या आवडीचे क्षेत्र निवडू दया, असे आवाहनही त्यांनी उपस्थित पालकांना केले. पटवर्धन हायस्कुलच्या मुख्याध्यापिका सौ. वेल्हाळ यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करताना देशातच नव्हे तर देशाबाहेरही झेप फाऊंडेशन या संस्थेने आपल्या कार्याचा ठसा उमटवावा, असे आवाहन केले.

मान्यवरांच्या मनोगतानंतर उपस्थित गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे सुत्रसंचालन पदवीधर शिक्षक व राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त संतोष वाळिंबे यांनी तर आभार सुनिल पवार यांना मानले.

पटवर्धन हायस्कुलचे शिक्षकेत्तर कर्मचारी प्रदिप जोशी यांचाही मान्यवरांच्या हस्ते सहकार्याबद्दल सत्कार करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम संस्था अध्यक्ष दादा ढेकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

Breaking News

Bezpečnost a důvěryhodnost winrolla

V digitálním světě online hazardních her je důvěryhodnost a...

देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे

देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे--काही मांगण्या मान्य करण्यात...