विधिमंडळातील सहकारी शिवसेना आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली कुडाळ येथे स्थापन करण्यात आलेल्या ‘सिंधुदुर्गचा राजा’ श्री गणरायाचे शिवसेना उपनेते आणि राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी मनोभावे दर्शन घेतले.
त्यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सिंधुदुर्गच्या राजाच्या चरणी सिंधुदुर्गसह संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली.
