रत्नागिरीशालेय उपक्रमांतर्गत गणपतीपुळे येथील प्राचीन कोकणला विद्यार्थ्यांची भेट

शालेय उपक्रमांतर्गत गणपतीपुळे येथील प्राचीन कोकणला विद्यार्थ्यांची भेट

शालेय उपक्रमांतर्गत गणपतीपुळे येथील प्राचीन कोकणला विद्यार्थ्यांची भेट
रत्नागिरी, (रत्नागिरी वार्ताहर)
एम. एस. नाईक फाउंडेशन संचलित एम. सिद्दीक नाईक हायस्कूल, रत्नागिरी यांच्या वतीने शालेय उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी गणपतीपुळे येथील प्राचीन कोकणला क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली.
या क्षेत्रभेटीमध्ये ४६ विद्यार्थी सहभागी झाले. विद्यार्थ्यांसोबत स्काऊट शिक्षक श्री. रमजान वलीमोहम्मद जमादार, गाईड शिक्षिका श्रीमती आस्मा जमादार आणि शिपाई श्रीमती हर्षदा
भुरवणे उपस्थित होत्या.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाची माहिती प्रत्यक्ष अनुभवातून मिळवून देणे, तसेच त्यांच्यामध्ये निरीक्षणशक्ती, जिज्ञासा आणि ऐतिहासिक स्थळांविषयी आवड निर्माण करणे हा आहे.
संस्थेचे अध्यक्ष श्री. नोमान नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अकिब काझी आणि माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. अशफाक नाईक,प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती आरिफा म्हालदार यांनी या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
या क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडून त्यांना अभ्यासाबरोबरच प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळणार आहे.

Breaking News

सावर्डे विद्यालयात ‘वर्ग ग्रंथालय’ उपक्रमातून वाचन संस्कृतीला चालना

सावर्डे विद्यालयात ‘वर्ग ग्रंथालय’ उपक्रमातून वाचन संस्कृतीला चालनावाचन प्रेरणा...