रत्नागिरीशालेय तायक्वांदो तालुका स्पर्धेत सह्याद्री शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मीडियम स्कूलची दमदार कामगिरी

शालेय तायक्वांदो तालुका स्पर्धेत सह्याद्री शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मीडियम स्कूलची दमदार कामगिरी

शालेय तायक्वांदो तालुका स्पर्धेत सह्याद्री शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मीडियम स्कूलची दमदार कामगिरी

२ सुवर्णपदके आणि १ रौप्यपदकाची कमाई; तिघांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

सावर्डे चिपळूण – चिपळूण तालुक्यातील बांधल हायस्कूल येथे सोमवारी झालेल्या तालुकास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत सह्याद्री शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. या स्पर्धेत स्वर घाग आणि मयुरेश लाड यांनी सुवर्णपदक, तर समर्थ लाड याने रौप्यपदक पटकावले. या दमदार कामगिरीमुळे तिन्ही विद्यार्थ्यांनी राजापूर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी झेप घेतली आहे.या यशाबद्दल विद्यार्थ्यांवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. शेखर निकम, सचिव महेश महाडिक, कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम, जिल्हा परिषद सदस्य, स्कूल चेअरमन सौ. पूजा निकम, मुख्याध्यापिका मीरा जोशी, क्रीडा शिक्षक व शिक्षकवर्ग तसेच तायक्वांदो प्रशिक्षक भरत कर्रा, अमेय क्लासेसचे चेअरमन राम नादिवडेकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
🏅 स्वर घागची उल्लेखनीय कामगिरी
नायशी येथील पत्रकार संदीप घाग यांचा मुलगा स्वर संदीप घाग याने यापूर्वीही तायक्वांदो स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. २०२५ मध्ये जिल्हास्तरीय तायक्वांदो चॅम्पियनशिपमध्ये ओपन चॅलेंज फाईटमध्ये कांस्यपदक, फ्रीस्टाइल पुमसेमध्ये कांस्यपदक तसेच शालेय तायक्वांदो स्पर्धेत कांस्यपदक, अशी एकूण तीन पदके त्याने यापूर्वी मिळवली होती.
सोमवारी दिनांक 7सप्टेंबर रोजी पार पडलेल्या तालुकास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत त्याने आपल्या कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. मेहनत, सराव आणि जिद्दीचे यश पटकावले आहे
पदक प्राप्त मयुरेश लाड आणि समर्थ लाड हे सावर्डे येथील अमेय क्लासेसमध्ये प्रशिक्षक भरत कर्रा यांच्या मार्गदर्शनाखाली तायक्वांदोचे प्रशिक्षण घेत आहेत. तर स्वर घाग (नायशी) याने ऑक्टोबर २०२४ पासून कराटेचे प्रशिक्षण सुरू केले आहे.
लहान वयातच प्रचंड मेहनत, नियमित सराव, जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक प्रयत्न यांच्या जोरावर या तिन्ही विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे.जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या स्वर घाग, मयुरेश लाड आणि समर्थ लाड यांना पुढील आमदार शेखर निकम यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत

Breaking News

एसएम जोशी फिजीओथेरपी महाविद्यालयाचे स्ट्रोक हृदयविकार जागरुकता शिबीर

एसएम जोशी फिजीओथेरपी महाविद्यालयाचे स्ट्रोक हृदयविकार जागरुकता शिबीर 👉आजच्या व्यस्त...

स्वर घागची तायक्वांदोमध्ये सुवर्ण कामगिरी; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

स्वर घागची तायक्वांदोमध्ये सुवर्ण कामगिरी; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड चिपळूण :...