मुंबई महा पालिकेसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने कंबर कसली असून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना अलर्ट मोडवर राहण्यास सांगितलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होईपर्यंत कुणीही आपल्या कार्यक्षेत्राबाहेर जाऊ नयेत असा आदेश उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. हा आदेश शिवसेना शाखाप्रमुखापर्यंत लागू आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होईपर्यंत नेत्यांनी, आमदार-खासदारांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि शाखाप्रमुखांनी त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातच राहण्याच्या सूचना