रत्नागिरीसती चिंचघरी प्राथमिक शाळेच्या गोपमेळ्यात गोविंदा आले रे च्या गजरात चिमुकल्यांची दहीहंडी...

सती चिंचघरी प्राथमिक शाळेच्या गोपमेळ्यात गोविंदा आले रे च्या गजरात चिमुकल्यांची दहीहंडी उत्साहात संपन्न

सती चिंचघरी प्राथमिक शाळेच्या गोपमेळ्यात गोविंदा आले रे च्या गजरात चिमुकल्यांची दहीहंडी उत्साहात संपन्न

सह्याद्री शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा, खेर्डी चिंचघरी (सती) येथे गोकुळाष्टमी निमित्ताने पारंपरिक दहीहंडीचा उत्सव चिमुकल्यांच्या सहभागातून उत्साहात साजरा करण्यात आला. संस्कृतीची जोपासना, परंपरेची जपणूक व त्यामागील शास्त्रीय आधार विद्यार्थ्यांना लहान वयातच समजावा, या उद्देशाने शाळेत विविध सण-उत्सव साजरे केले जातात.शाळेचे मुख्याध्यापक अरविंद सकपाळ सर यांच्या संकल्पनेतून यंदाही दहीहंडीचे आयोजन करण्यात आले. शिक्षक संदेश सावंत सर यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने दहीहंडी बांधून या परंपरेविषयी माहिती दिली. यावेळी मुलांनी श्रीकृष्णाची तर मुलींनी राधेची वेशभूषा करून रंगत आणली होती. कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ शिक्षिका मनिषा कांबळी ,रश्मी राजेशिर्के, विजया मौजे तसेच उपस्थित शिक्षकवृंदांच्या हस्ते राधा-कृष्ण पूजनाने झाली.
शिक्षिका ज्योती चाळके यांनी गोपाळकाला व दहीहंडी उत्सवाचे धार्मिक व सामाजिक महत्त्व स्पष्ट केले. त्यानंतर “गोविंदा रे गोपाळा”च्या गजरात थरावर थर रचत विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडून आनंदोत्सव साजरा केला.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक अरविंद सकपाळ, ज्येष्ठ शिक्षिका मनीषा कांबळी, रश्मी राजेशिर्के, संदेश सावंत, अपूर्वा शिंदे, विनया नटे, वृषाली राणे, अर्चना देशमुख, ज्योती चाळके, रूपाली खरात, वर्षा सकपाळ, शितल पाटील, स्वरा भुरण तसेच शिक्षकेतर कर्मचारी विजया मौजे, विनोद उदेग व एकनाथ चाळके यांनी विशेष मेहनत घेतली.

Breaking News

नियोजन समितीच्या निधीतून जिल्ह्याचा गतिमान विकास साधा; नोव्हेंबरपर्यंत कामे सुरू करा : पालकमंत्री डॉ. उदय सामंत

नियोजन समितीच्या निधीतून जिल्ह्याचा गतिमान विकास साधा; नोव्हेंबरपर्यंत कामे...

राज्य फेडरेशन च्या पोटनियमात सुधारणा, ठेव संरक्षणासाठी शासनाने भरीव योगदान देण्याची मागणी

राज्य फेडरेशन च्या पोटनियमात सुधारणा, ठेव संरक्षणासाठी शासनाने भरीव...