सह्याद्री हिल्स मॅरेथॉन २०२६ चा आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला शुभारंभ..

0
15

सह्याद्री हिल्स मॅरेथॉन २०२६ चा आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला शुभारंभ..

▶️‘एक धाव माय मराठी आणि पर्यावरणासाठी’ उपक्रमाला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद-
👉🏻लांजा तालुक्यातील शिपोशी येथे माजी विद्यार्थी विचार मंच, शिपोशी आणि दहावी सत्र १९९०-९१ परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने प्रायोजक राज्य मराठी विकास संस्था आयोजित ‘सह्याद्री हिल्स मॅरेथॉन २०२६ – एक धाव माय मराठी आणि पर्यावरणासाठी’ ही स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

मराठी भाषा, संस्कृती आणि निसर्ग संवर्धनाचा संदेश जनमानसात रुजविण्यासह आरोग्यदायी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.

कोकणच्या निसर्गरम्य भूमीत आयोजित या उपक्रमात आजी-माजी विद्यार्थी, आयोजक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. माय मराठीचा अभिमान, पर्यावरण संवर्धन आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे आमदार किरण सामंत यांनी कौतुक करून सर्व आयोजकांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी सभापती मानसी आंबेकर, विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनिल उर्फ राजू कुरूप, शिवसेना तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, जि.प.सदस्य मनीषा लाखन, उप तालुकाप्रमुख सुजित आंबेकर, तालुका संघटक प्रसाद माने, उपतालुका संघटक चेतन खंदारे, जिल्हा बँक संचालक महेश खामकर, बाबा भिंगार्डे, योगेश वाघधरे, पं.स.सदस्य उमेश पत्की, शैलेश खामकर, उपसरपंच पांडुरंग साळुंखे, गणेश लाखन यांच्यासह पदाधिकारी,आयोजक, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here