रत्नागिरीसामाजिक भावनेतून जपलेले विद्यालयाचे संस्कार -प्राथमिक शाळा खेर्डी, चिंचघरीच्या विद्यार्थ्यांनी खाऊच्या पैशांतून...

सामाजिक भावनेतून जपलेले विद्यालयाचे संस्कार -प्राथमिक शाळा खेर्डी, चिंचघरीच्या विद्यार्थ्यांनी खाऊच्या पैशांतून मतिमंद मुलांना केली भरघोस मदत

सामाजिक भावनेतून जपलेले विद्यालयाचे संस्कार -प्राथमिक शाळा खेर्डी, चिंचघरीच्या विद्यार्थ्यांनी खाऊच्या पैशांतून मतिमंद मुलांना केली भरघोस मदत

सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम

प्राथमिक शाळा खेर्डी चिंचघरी सती ता. चिपळूण हे विद्यालय उपक्रमशील विद्यालय म्हणून सर्वश्रूत आहे . शाळेचे मुख्याध्यापक श्री.अरविंद सकपाळ यांच्या संकल्पनेतून
विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, सहकार्याची भावना आणि गरजू व्यक्तींप्रती संवेदनशीलता निर्माण व्हावी, या उदात्त हेतूने विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एक स्तुत्य उपक्रम राबविला. विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊसाठी मिळणाऱ्या पैशांतून बचत करून विशेष गरजा असलेल्या मुलांना मदतीचा हात दिला. जिद्द मतिमंद शाळेचे मुख्याध्यापक श्री शिंदे सर व विद्यार्थ्यांकडे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री . सकपाळ सर व सर्व शिक्षक वृंदांनी तीस हजार रुपये इतका निधी सुपूर्द केला.विद्यार्थ्यांनी स्वेच्छेने केलेल्या या मदतीतून त्यांच्यातील दातृत्वाची भावना आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले.आजच्या काळात स्वतःपुरता विचार न करता इतरांच्या आनंदासाठी काहीतरी करण्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याच भावनेतून विद्यार्थ्यांनी आपल्या छोट्या-छोट्या बचतीचे योगदान देत सामाजिक सेवेचा मोठा आदर्श निर्माण केला. विद्यार्थ्यांनी केलेल्या या मदतीमुळे विशेष गरजा असलेल्या मुलांना आधार मिळण्याबरोबरच विद्यार्थ्यांनाही परोपकार, सहकार्य आणि माणुसकीचे मोल समजले. यासाठी पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले. हा निधी गोळा करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक अरविंद सकपाळ सर , शिक्षिका मनिषा कांबळी, रश्मी राजेशिर्के, शसंदेश सावंत, अपूर्वा शिंदे, विनया नटे, वृषाली राणे, अर्चना देशमुख, रूपाली खरात, ज्योती चाळके, वर्षा सकपाळ, शितल पाटील,स्वरा भुरण यांनी मार्गदर्शन केले .

Breaking News