सावर्डे विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

सावर्डे विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

सावर्डे विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
सावर्डे,  : सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे बारावा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.
केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने निर्धारित केलेल्या अधिकृत योग प्रोटोकॉलनुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी सामूहिक योग प्रार्थना व ओंकार जप करण्यात आला. त्यानंतर शरीराला ताण देणाऱ्या विविध पूरक हालचालींसह विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी ताडासन, अर्धचक्रासन, वृक्षासन, त्रिकोणासन, पादहस्तासन, भद्रासन, शशांकासन, अर्ध उष्ट्रासन, वक्रासन, भुजंगासन, शलभासन, मकरासन, सेतुबंधासन, पवनमुक्तासन आणि शवासन यांसारखी विविध योगासने केली.
यावेळी कपालभाती, अनुलोम-विलोम आणि भ्रामरी या प्राणायामांचाही सराव करण्यात आला. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहते, असा संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमास उपमुख्याध्यापक विजय चव्हाण, पर्यवेक्षक महेश कुलकर्णी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत योगासने व प्राणायामाचा सराव केला.
आरोग्यदायी जीवनशैलीचा संकल्प आणि शांतीपाठाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन क्रीडाशिक्षक दादासाहेब पांढरे, अमृत कडगावे, रोहित गमरे, प्रशांत सकपाळ आणि योगेश नाचणकर यांनी केले. विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

Breaking News

नवनिर्माण महाविद्यालयात 12 वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात करण्यात आला साजरा

नवनिर्माण महाविद्यालयात 12 वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात करण्यात...

पटवर्धन हायस्कूल रत्नागिरी ची शैक्षणिक दिनदर्शिका व वाढदिवस शुभेच्छा कार्ड चे प्रकाशन उत्साहात संपन्न

पटवर्धन हायस्कूल रत्नागिरी ची शैक्षणिक दिनदर्शिका व वाढदिवस शुभेच्छा...