Home रत्नागिरी सावर्डे विद्यालयात गणित समूह मार्फत ‘गणिती कोडे’ उपक्रम उत्साहात साजरा

सावर्डे विद्यालयात गणित समूह मार्फत ‘गणिती कोडे’ उपक्रम उत्साहात साजरा

0
सावर्डे विद्यालयात गणित समूह मार्फत ‘गणिती कोडे’ उपक्रम उत्साहात साजरा

सावर्डे – सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विविध शैक्षणिक उपक्रमांतर्गत गणित समूहाच्या वतीने ‘गणिती कोडे’ हा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. शासनाच्या गणित समूह उपक्रमाचा एक भाग म्हणून हा कार्यक्रम शनिवार, दि. ६ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला.

या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील कोडी सोडवण्याची पद्धत समजावून देणे, गणिताचा अभ्यास मनोरंजक पद्धतीने कसा करता येईल याची गोडी लावणे आणि विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयी आवड निर्माण करणे हा होता. या उपक्रमाचे संपूर्ण नियोजन गणित समूहातील विद्यार्थ्यांनी स्वतःहून केले. समूह प्रमुख इयत्ता सातवी व मधील रिया सुर्वे, यश कदम, गार्गी घडशी, अर्णवी ठमके, समर्थ सोनवणे व सारंगी पाटील यांनी विविध रोचक गणिती कोडी विद्यार्थ्यांना देऊन त्यांची गणिती विचारशक्ती वृद्धिंगत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

चार चौकार पंधरा कोडे मेंदूचे ट्रिझर वर्गमूळ घनमूळ या विषयांतर्गत सुमारे एक तास विद्यार्थी कोडी सोडवण्यात रमले होते. या मजेदार शिक्षण कार्यक्रमाचे नियोजन विषय समूह गणिताचे श्री. साजिद चिकटे, श्री. गणेश बागवे व श्री. प्रशांत सकपाळ यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही गणित समूहातील विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहात पार पाडले.

या उपक्रमाचे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. राजेंद्रकुमार वारे, उपमुख्याध्यापक श्री. विजय चव्हाण तसेच ज्येष्ठ शिक्षक श्री. अशोक शितोळे, श्री. नारायण कालप व श्री. मनोज कुलकर्णी यांनी विशेष कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here