कोकणसिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी येथे श्री देवी भराडी माता उत्सवाच्या निमित्ताने राज्याचे उद्योग...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी येथे श्री देवी भराडी माता उत्सवाच्या निमित्ताने राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत ह्यांनी उपस्थिती दर्शवली.

यावेळी ना. उदय सामंत ह्यांनी श्री देवी भराडी मातेचे दर्शन घेतले आणि भविष्यात कोणावरही संकट येऊ नये यासाठी देवी चरणी प्रार्थना केली.
यासोबतच, आंगणे कुटुंबीयांनी मांडलेल्या विकासात्मक मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. आंगणे कुटुंबीयांना अभिप्रेत असलेला विकास लवकरच प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्न केले जातील असं वक्तव्य मा.उदय सामंत ह्यांनी केले. यावेळी ना. उदयजी सामंत ह्यांच्या शुभहस्ते पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुलाचे वाटप देखील करण्यात आले.

या प्रसंगी आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने आलेले भाविक उपस्थित होते.

Breaking News

शालेय उपक्रमांतर्गत गणपतीपुळे येथील प्राचीन कोकणला विद्यार्थ्यांची भेट

शालेय उपक्रमांतर्गत गणपतीपुळे येथील प्राचीन कोकणला विद्यार्थ्यांची भेटरत्नागिरी, (रत्नागिरी...

सावर्डे विद्यालयात ‘वर्ग ग्रंथालय’ उपक्रमातून वाचन संस्कृतीला चालना

सावर्डे विद्यालयात ‘वर्ग ग्रंथालय’ उपक्रमातून वाचन संस्कृतीला चालनावाचन प्रेरणा...