Home रत्नागिरी सुमन विद्यालय व प्राथमिक शाळा टेरव येथे मोफत वह्या वाटप, बेस्ट शिव हनुमान मंदिर ट्रस्ट, मुंबई यांचा प्रेरणादायी उपक्रम.

सुमन विद्यालय व प्राथमिक शाळा टेरव येथे मोफत वह्या वाटप, बेस्ट शिव हनुमान मंदिर ट्रस्ट, मुंबई यांचा प्रेरणादायी उपक्रम.

सुमन विद्यालय व प्राथमिक शाळा टेरव येथे मोफत वह्या वाटप, बेस्ट शिव हनुमान मंदिर ट्रस्ट, मुंबई यांचा प्रेरणादायी उपक्रम.

चिपळूण: जय भवानी एज्युकेशन सोसायटी संचालित सुमन विद्यालय टेरव या प्रशालेमध्ये नुकतेच बेस्ट शिव हनुमान मंदिर ट्रस्ट सांताक्रुझ, मुंबई यांच्यावतीने इयत्ता ८ वी ते इयत्ता १० वी च्या १०७ विद्यार्थ्यांना ७२० वह्यांचे तसेच जि.प पूर्ण प्राथमिक मराठी शाळा टेरव क्रमांक १ शाळेत इयत्ता १ ली ते ७ वीच्या १३६ विद्यार्थ्यांना ९२४ वह्यांचे असे एकूण १६४४ वह्यांचे वाटप करण्यात आले. सदर वह्यांचे वितरण न्यासाचे अध्यक्ष श्री नंदकुमार राणे, उपाध्यक्ष श्री ओमप्रकाश सिंग, चिटणीस व काडवली गावचे सुपुत्र श्री नारायण चव्हाण, यांनी केले. सदर प्रसंगी जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री योगेश कदम, संचालक तसेच सरस्वती कोचिंग क्लासेस, सरस्वती एज्युकेशन ट्रस्ट, मुंबईचे विश्वस्त व विशेष कार्यकारी अधिकारी श्री. सुधाकर कदम उपस्थित होते.

शिक्षणातील अडथळे दूर करून विद्यार्थ्यांना सक्षम करण्याचा उद्देश या उपक्रमामागे असून, न्यायाचा सेवाभाव समाजासाठी खरोखरच प्रेरणादायी ठरतो आहे. वरील न्यासाच्या वतीने आदिवासी पाड्यातील तसेच कोकण व महाराष्ट्रातील विविध शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना निःशुल्क वह्या वाटप केले जाते. वह्या मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची आणि आत्मविश्वासाची झळक स्पष्ट दिसून आली.

बेस्ट शिव हनुमान मंदिर ट्रस्टच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांचे जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे सुमन विद्यालय टेरव व जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा टेरव क्रमांक एक यांच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले.

न्यासाच्या सामाजिक बांधिलकीचा हा उज्ज्वल आदर्श भविष्यातही अनेक गरजू विद्यार्थ्यांचे जीवन उजळवेल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.

सदर शैक्षणिक मदत विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी सरस्वती कोचिंग क्लासेस मुंबईचे संस्थापक तसेच जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार श्री.अजित कदम त्याचप्रमाणे श्री.सुधाकर कदम यांनी विशेष प्रयत्न केले. सदर प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. मंदार सुर्वे, दिपक मोने तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.अमोल टाकळे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here