रत्नागिरीसेवा संकल्प अभियान; गरजू लोकांपर्यंत प्रशासकीय यंत्रणा पोहोचली पाहिजे - निवासी उपजिल्हाधिकारी...

सेवा संकल्प अभियान; गरजू लोकांपर्यंत प्रशासकीय यंत्रणा पोहोचली पाहिजे – निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी

सेवा संकल्प अभियान; गरजू लोकांपर्यंत प्रशासकीय यंत्रणा पोहोचली पाहिजे – निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी
रत्नागिरी, (जिमाका):- सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून गरजू लोकांपर्यत प्रशासकीय यंत्रणा पोहोचली पाहिजे, अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सेवा संकल्प अभियानबाबत आढावा बैठक आज झाली. या बैठकीला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, तहसिलदार राजाराम म्हात्रे, मुख्याधिकारी वैभव गारवे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मनोज पाटणकर, कौशल्य विकासचे सहायक आयुक्त दत्ता चव्हाण आदी उपस्थित होते.
निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सूर्यवंशी म्हणाले, रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, वृक्षारोपण आदी कार्यक्रम विविध ठिकाणी सुरु आहेत. विसर्जन स्थळी स्वच्छता ही सेवा हा उपक्रम देखील झालेला आहे. याबाबत संबंधित यंत्रणांनी स्थानिक स्तरावर प्रसिध्दी करावी त्याबाबतचा फोटो, व्हिडीओसह अहवाल सादर करावा. व्हीजेएनटी, अनुसूचित जमाती, आदिवासी या प्रवर्गासाठी असणाऱ्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत तरच या सेवासंकल्प अभियानाची फलनिष्पत्ती झाली असे म्हणता येईल. दिव्यांगासह अन्य इतर विभागाच्या योजनांचा लाभ कार्यक्रमाच्या माध्यमातून अत्यंत गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी नियोजन करा.
त्यासाठी तालुकास्तरावर संबंधित सर्व विभागांची बैठक घेवून कृती कार्यक्रम आराखडे तयार करावेत आणि त्याची अंमलबजावणी देखील प्रभावीपणे करावी. या बैठकीला क्षेत्रीय स्तरावरील तहसिलदार, मुख्याधिकारी आदी अधिकारी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

Breaking News

सावर्डे विद्यालयात आपत्ती व्यवस्थापन, शोध व बचाव प्रशिक्षण

सावर्डे विद्यालयात आपत्ती व्यवस्थापन, शोध व बचाव प्रशिक्षण७४२ विद्यार्थ्यांना...

Game Selection Tips for Mostbet Casino

Finding the perfect game at a casino can feel...