Home महाराष्ट्र ५९ वी महाराष्ट्र राज्य आणि आंतरजिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत महिला गटात रत्नागिरीची आकांक्षा उदय कदम विजेती

५९ वी महाराष्ट्र राज्य आणि आंतरजिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत महिला गटात रत्नागिरीची आकांक्षा उदय कदम विजेती

५९ वी महाराष्ट्र राज्य आणि आंतरजिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत महिला गटात रत्नागिरीची आकांक्षा उदय कदम विजेती

नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने व ठाणे जिल्हा कॅरम असोसिएशन आयोजित ५९ वी महाराष्ट्र राज्य आणि आंतरजिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा २०२५-२६ दिनांक १० मे २०२५ ते १३ मे २०२५ रोजी नवी मुम्बई स्पोर्ट्स असोसिएशन, सेक्टर १ A, MGM हॉस्पिटल, वाशी, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत रत्नागिरीच्या आकांक्षा उदय कदम हिने मुंबईच्या मिताली पाठक वर 17-14, 25-02, 25-01 अशा तीन सेट पर्यंत रंगलेल्या सामन्यात मात करून महिला गटाचे विजेतेपद पटकाविले.
आकांक्षा कदम हिने मिळवलेल्या या यशाबद्दल ना. उदय सामंत साहेब, उद्योग व मराठी भाषा मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा व चिपळूण संगमेश्वर चे लोकप्रिय आमदार शेखर निकम, राजापूरचे आमदार किरण उर्फ भैया सामंत, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे सल्लागार मा. सुचय अण्णा रेडीज, अध्यक्ष प्रदीप भाटकर, उपाध्यक्ष सुरेंद्र देसाई, सचिव मिलिंद साप्ते व खजिनदार नितीन लिमये आणि सर्व जिल्हावासियांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here