७५ हजार खेळाडू, ३२ क्रीडाप्रकार…..ठाणे जिल्ह्यात रंगला क्रीडाकौशल्याचा महाकुंभ

0
9

७५ हजार खेळाडू, ३२ क्रीडाप्रकार…..ठाणे जिल्ह्यात रंगला क्रीडाकौशल्याचा महाकुंभ!

👉🏻ठाणे जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींसाठी पर्वणी ठरणाऱ्या ‘खासदार क्रीडासंग्राम पर्व २’चा शुभारंभ डोंबिवली येथील ह.भ.प. संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलात उत्साहपूर्ण वातावरणात झाला. या दिमाखदार सोहळ्याला शिवसेना उपनेते आणि राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी आवर्जून उपस्थित राहून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्पक मार्गदर्शनाखाली हा क्रीडा महोत्सव सुरु झालाय. यावर्षी ३२ क्रीडाप्रकार, ३५ हून अधिक क्रीडास्थळे आणि ७५ हजारांहून अधिक खेळाडूंच्या सहभागाचे उद्दिष्ट असलेला हा महोत्सव स्थानिक गुणवंत खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेण्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल.

खेळाडूंना प्रोत्साहन देतानाच त्यांच्यासाठी दर्जेदार क्रीडा सुविधा निर्माण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. स्थानिक स्तरावरून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वाचे पाऊल आहे, असे यावेळी मा. ना. उदयजी सामंत म्हणाले.

यावेळी सहकारी मंत्री दादा भुसे, प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार डॉ. बालाजी किणीकर, राजेश मोरे, सुलभा गायकवाड, रवींद्र फाटक, कुमार आयलानी, शिवसेनेचे चंद्रहार पाटील, ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर, कल्याण – डोंबिवलीच्या महापौर हर्षाली चौधरी, उल्हासनगरच्या महापौर अश्विनी निकम यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिनेअभिनेत्री निम्रत कौर यांचीही विशेष उपस्थिती लाभली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here