रत्नागिरीधामापुरात 'लोकसंवाद' अंतर्गत एसआयआर विषयी जनजागृती

धामापुरात ‘लोकसंवाद’ अंतर्गत एसआयआर विषयी जनजागृती

धामापुरात ‘लोकसंवाद’ अंतर्गत एसआयआर विषयी जनजागृती
नवमतदार आणि महिला मतदार वाढण्यासाठी बचत गट व स्थानिक नागरिकांनी पुढे यावे
– उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड
रत्नागिरी,  (जिमाका): भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ मोहिमेअंतर्गत प्रत्येक पात्र नागरिकाने मतदार यादीत नाव नोंदवून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, तसेच आपले मतदार यादीतील नाव तपासावे असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने संगमेश्वर तालुक्यातील धामापूर येथे सुवर्णसूर्य फांऊडेशनच्यावतीने अयोजित देखाव्यातील स्पर्धकांसाठी लोकसंवाद २०२६ कार्यक्रम करण्यात आला. सुवर्णसूर्य फाउंडेशन चे संस्थापक आणि संचालक प्रसाद देवस्थळी , नवसारी-निमाई चे मुख्य गावकर अनिल मिंडे, धनावडेवाडीचे वाडीप्रमुख सुभाष धनावडे, धनावडे वाडी गावकर संभाजी धनावडे, ज्येष्ठ समाजसेवक प्रभाकर धनावडे, युवा कार्यकर्ते कीर्तिराज सागवेकर, लवू महाकाळ, तांबडवाडी येथील शंकर बोल्ये , पांडुरंग पड्ये , तुकाराम बोल्ये , तसेच संजय लवंदे , प्रसाद देवस्थळी, राजा मिंडे, संजय मिंडे, सुरेश शिगवण, दत्ताराम शिगवण, निलेश शिगवण, संदीप मिंडे, सागर महाकाळ, निखिल शिगवण यांच्यासह धामापूर, ढोपरखोलवाडी, तांबडवाडी आणि धनावडेवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. गायकवाड यांनी सांगितले, मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात बीएलओमार्फत घरोघरी जाऊन १००% नोंदणी फॉर्म भरून घेण्यात आले. त्यानंतर ३१ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी आणि वगळण्यात आलेल्या नावांची (ASD) यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या याद्या मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संकेतस्थळावर तसेच बीएलओ, तहसील आणि पंचायत कार्यालयांत उपलब्ध आहेत.
३० सप्टेंबरपर्यंत दावे व हरकती नोंदवण्याची संधी
सध्या सुरू असलेल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत नागरिकांना दावे व हरकती दाखल करता येतील. त्यासाठी खालील नमुने उपलब्ध आहेत:

  • नमुना ६: नवीन मतदार नोंदणीसाठी.
  • नमुना ७: मयत अथवा स्थलांतरित व्यक्तींचे नाव मतदार यादीतून वगळण्यासाठी.
  • नमुना ८: नावातील बदल, पत्ता दुरुस्ती, छायाचित्र बदल किंवा इतर सुधारणांसाठी.
    हे अर्ज बीएलओ, तहसील कार्यालयात ऑफलाइन स्वरूपात तसेच voters.eci.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर अथवा मोबाईल ॲपद्वारे आधार ओटीपी प्रमाणीकरणासह ऑनलाइन भरता येतील.
    वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या नवमतदारांची शंभर टक्के नोंदणी व्हावी आणि महिलांचा मतदार प्रमाणातील टक्का (जेंडर रेशो) वाढावा, यासाठी बचत गट व स्थानिक नागरिकांनी पुढे येऊन पुढाकार घ्यावा, असे आवाहन श्री. गायकवाड यांनी शेवटी केले. सुरवातील जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी लोकसंवाद २०२६ याविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी श्री. देवस्थळी यांनी मार्गदर्शन केले. प्रदीप धनावडे, राज धनावडे, विशाल धनावडे, रमेश धनावडे, संचित पड्ये, मुकुंद पड्ये, रोहित बोले, मुकेश पड्ये, सूरज मिंडे, नितीन पवार, ऋषीकेश रामाणे, रोशन रामाणे, स्वप्नील भायजे, शौर्य गिजये, रोशन भायजे, शिवराम भायजे, सुजय रामाणे, श्रीतेजन रामाणे, रविंद्र चव्हाण, अजय गुरव, अनिता महाडीक, आयुष देवरुखकर, सचिन चव्हाण, विद्याधर गावडे, रूपेश कांबळे, रोशन धामणाक, राहुल महाडीक, महेश गोरे, वल्लरी देवस्थळी यांचा या सजावट स्पर्धेत सहभागी झाले होते.

Breaking News

Általános online casino befizetési útmutató

A legtöbb online játékos számára a befizetési feladat áll...

Effortless Deposits at Caswino Casino: Your Step-by-Step Guide

Choosing the right deposit method can feel daunting, but...