रत्नागिरीनाणीज मठात आमदार किरण सामंत यांनी घेतले गणरायाचे दर्शन

नाणीज मठात आमदार किरण सामंत यांनी घेतले गणरायाचे दर्शन

🔴नाणीज मठात आमदार किरण सामंत यांनी घेतले गणरायाचे दर्शन

🔴जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा; आमदारांच्या कार्याचे महाराजांकडून कौतुक

रत्नागिरी : जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या नाणीज येथील मठात विराजमान झालेल्या गणपती बाप्पाचे लांजा -राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण (भैय्या) सामंत यांनी उपस्थित राहून भक्तिभावाने दर्शन घेतले.

यावेळी त्यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांची भेट घेऊन त्यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला.
गणेशोत्सवानिमित्त नाणीज मठात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार किरण सामंत यांनी मठाला भेट देत श्री गणेशाचे दर्शन घेतले.

गणरायाच्या चरणी मतदारसंघातील नागरिकांच्या सुख-समृद्धीसाठी तसेच सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना केली.

यानंतर आमदार किरण सामंत यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांची भेट घेतली. यावेळी सामाजिक, धार्मिक तसेच मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत चर्चा झाली.

जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करत असलेल्या आमदार किरण सामंत यांच्या कार्याची माहिती घेत जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले.
आमदार किरण सामंत हे मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

विकासकामांसोबतच सामाजिक आणि सार्वजनिक उपक्रमांमध्येही त्यांचा सहभाग असल्याबद्दल महाराजांनी सकारात्मक भावना व्यक्त केल्या.

या भेटीमुळे नाणीज मठ आणिलांजा-राजापूर-साखरपा मतदारसंघातील सामाजिक व आध्यात्मिक नात्याला आणखी बळ मिळाले, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

यावेळी मठातील पदाधिकारी, सेवेकरी, कार्यकर्ते आणि भक्तगण उपस्थित होते. आमदार किरण सामंत यांच्या नाणीज मठ भेटीमुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

Breaking News

Általános online casino befizetési útmutató

A legtöbb online játékos számára a befizetési feladat áll...

Effortless Deposits at Caswino Casino: Your Step-by-Step Guide

Choosing the right deposit method can feel daunting, but...