रत्नागिरीभोम येथे ‘राष्ट्रीय पोषण माह’ व ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत सुपोषण दिन...

भोम येथे ‘राष्ट्रीय पोषण माह’ व ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत सुपोषण दिन व किशोरी समुपदेशन कार्यक्रम उत्साहात संपन्न

भोम येथे ‘राष्ट्रीय पोषण माह’ व ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत सुपोषण दिन व किशोरी समुपदेशन कार्यक्रम उत्साहात संपन्न
रत्नागिरी, (जिमाका) : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प चिपळूण १, बिट कापरे अंतर्गत अंगणवाडी केंद्र भोम मधली येथे शनिवार, २६ सप्टेंबर २०२६ रोजी ‘राष्ट्रीय पोषण माह’ तसेच ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत विशेष मार्गदर्शन व समुपदेशन शिबिर उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात सुपोषण दिन आणि किशोरी जीवन कौशल्य विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती मयुरी शिर्के आणि चिपळूण पंचायत समितीच्या सदस्या पूजा जवरत यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या शिबिरादरम्यान उपस्थित महिला, किशोरी मुली आणि ग्रामस्थांना दैनंदिन आहारातील पोषणमूल्ये, कुपोषणमुक्तीसाठी सुपोषण दिनाचे महत्त्व, मुलींच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक असणारी किशोरी जीवन कौशल्ये (Life Skills) आणि ‘बेटी बचाओ’चा संदेश देत मुलींच्या जन्माचे जल्लोषात स्वागत याविषयी सखोल समुपदेशन करण्यात आले.
या उपक्रमाला भोम गावातील महिला, किशोरी मुली, ग्रामस्थ तसेच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. निरोगी पिढीच्या घडणीसाठी अशा जनजागृती कार्यक्रमांची गावोगावी गरज असल्याचे यावेळी मान्यवरांनी प्रतिपादन केले.

Breaking News

भरती परीक्षा पारदर्शक करा;

भरती परीक्षा पारदर्शक करा; स्थानिक भूमिपुत्रांना गुणवत्तेनुसार रोजगाराची संधी द्या! दि....

शिक्षण विभाग राजपत्रित अधिकारी संघटनेचे मुंबईत धरणे आंदोलन

शिक्षण विभाग राजपत्रित अधिकारी संघटनेचे मुंबईत धरणे आंदोलन---- न्याय न...