रत्नागिरीमालगुंड बीटमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ व ‘राष्ट्रीय पोषण अभियान’

मालगुंड बीटमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ व ‘राष्ट्रीय पोषण अभियान’

मालगुंड बीटमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ व ‘राष्ट्रीय पोषण अभियान’;

विविध शासकीय योजनांची जनजागृती
रत्नागिरी, (जिमाका) : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (रत्नागिरी-२) अंतर्गत मालगुंड बीटमधील गणपतीपुळे, मालगुंड व नेवरे परिसरामध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ आणि ‘राष्ट्रीय पोषण अभियान’ उत्साहात राबविण्यात आले. या अभियानाच्या माध्यमातून महिला व बाल विकास विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध शासकीय कल्याणकारी योजनांची माहिती पत्रके वाटून नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यात आली.
या उपक्रमादरम्यान शासनाच्या ‘लेक लाडकी योजना’, ‘प्रधानमंत्री मातृवंदना योजना’ यांसह महिला व बालकांसाठी असलेल्या विविध योजनांचे स्वरूप, निकष आणि लाभाविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय आरोग्य व स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ करण्यात आला, तर नेवरे येथे वृक्षारोपणही करण्यात आले.
या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य राजेश साळवी, पंचायत समिती सदस्या पूर्वा दुर्गुडे, गट विकास अधिकारी शेळके, तसेच इतर विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच आयसीडीएस प्रकल्प-२ (मालगुंड बीट) पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, मालगुंड ग्रामपंचायतीच्या सरपंच खेऊर, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, स्थानिक महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Breaking News