रत्नागिरीसती चिंचघरी प्राथमिक विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात संपन्न

सती चिंचघरी प्राथमिक विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात संपन्न

सती चिंचघरी प्राथमिक विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात संपन्न

सहयाद्रि शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा खेर्डी- चिंचघरी (सती) या प्राथमिक विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली.कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अरविंद सकपाळ सर यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला .यावेळी घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत लहान गटात प्रथम आरुष दिपक चाळके , व्दितीय विहान हेमंत अदावडे तर तृतीय श्रीजा सिद्धांत शेट्ये ,उत्तेजनार्थ स्वरा स्वप्निल शिगवण . तर मोठ्या गटात प्रथम दिया किरण म्हादे व अनया संतोष लांबे , द्वितीय मनस्वी सचिन कदम तृतीय आराध्या दिनेश कदम याप्रमाणे विद्यार्थ्यांनी गुणानुक्रम पटकावले. या विद्यार्थ्याना प्रमाणपत्र व भेटवस्तू देवून गौरविण्यात आले. या स्पर्धेचे परिक्षण अपूर्वा शिंदे व अर्चना देशमुख यांनी केले .शिक्षक मनोगतात ज्येष्ठ शिक्षिका मनिषा कांबळी यांनी राष्टूपिता मा गांधीजी यांच्या विषयी तर वृषाली राणे यांनी लालबहादूर शास्त्री यांच्याविषयी अधिक माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात श्री. अरविंद सकपाळ यांनी या महान व्यक्तींचे गुण अंगिकारणेबाबत आवाहन केले .कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिक्षिका रश्मी राजेशिर्के यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी
मुख्याध्यापक अरविंद सकपाळ, शिक्षिका मनिषा कांबळी, रश्मी राजेशिर्के, संदेश सावंत , अपूर्वा शिंदे ,विनया नटे, वृषाली राणे, अर्चना देशमुख, ज्योती चाळके , रूपाली खरात, वर्षा सकपाळ, शितल पाटील, स्वरा भुरण, तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्री. विनोद उदेग, एकनाथ चाळके, प्रतिभा तांबिटकर यांनी विशेष मेहनत घेतली.

Breaking News

महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरीरत्नागिरी येथील एम. एस. नाईक...