रत्नागिरीपुण्यातील डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्थेमध्ये(मानिव अभिमतविद्यापीठ) 'अभिजात मराठी भाषा अध्ययन...

पुण्यातील डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्थेमध्ये(मानिव अभिमतविद्यापीठ) ‘अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र’ होणार

पुण्यातील डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्थेमध्ये(मानिव अभिमतविद्यापीठ) ‘अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र’ होणार : मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत

आज आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाची, आदराची आणि अभिमानाची ऐतिहासिक बातमी केवळमहाराष्ट्रातीलच नव्हे, तर जगभरातील मराठी भाषिकांना आनंद होईल

भारत सरकारद्वारे सांस्कृतिक मंत्रालयाने
४ ऑक्टोबर २०२४ रोजी मराठी भाषेला
‘अभिजात भाषेचा’ दर्जाबहाल
करण्यात आला आहे.

या ऐतिहासिक निर्णयाचा पुढील टप्पा
म्हणून, केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने पुणे येथील ऐतिहासिक डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्थेमध्ये (मानिव अभिमत विद्यापीठ) ‘अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र’ (Centre of Excellence for Studies in Classical Marathi) स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे.

  • प्रकल्प अहवाल आणि निधी: या
    केंद्रासाठी तज्ज्ञांमार्फत सविस्तर प्रकल्प
    अहवाल (DPR) तयार करण्यात आला
    असून तो लवकरच सादर केला जाईल. या माध्यमातून केंद्र सरकारकडून मराठी
    भाषेच्या संवर्धनासाठी आणि विविध प्रकल्पांसाठी मोठा निधी प्राप्त होणार
    आहे.

मराठी भाषा सन्मान दिनाच्या पूर्वसंध्येला
मिळालेले हे यश आपल्या मराठी संस्कृतीचे
आणि भाषेचेवैभव वाढवणारे आहे.

आपल्या मातृभाषेचा हा गौरव साजरा
करताना आपल्याला अत्यंत अभिमान वाटत
आहे.

जय हिंद, जय महाराष्ट्र !

Breaking News

रत्नागिरीत युवा सेनेत युवकांचा जाहीर प्रवेश

👉रत्नागिरीत युवा सेनेत युवकांचा जाहीर प्रवेश- पालकमंत्री उदय सामंत...

सरस्वती कोचिंग क्लासेसचे अजित कदम यांना ‘शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्कार प्रदान

सरस्वती कोचिंग क्लासेसचे अजित कदम यांना ‘शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्कार...