रत्नागिरीत स्पोर्ट्स टुरिझमला चालना देण्यासाठी राजस्थान रॉयल्सचा पुढाकार!
🏏 राजस्थान रॉयल्सच्या High Performance Center च्या टीमने रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमची पाहणी केली व त्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
रत्नागिरीतील ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना आधुनिक प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासह स्पोर्ट्स टुरिझमच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न आहे. या उपक्रमासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी यावेळी दिली.
यावेळी HPC डायरेक्टर व राजस्थान रॉयल्स टीम मॅनेजर रोमी भिंडर, COO आलोक चित्रे, HPC कोच प्रशांत कांबळे आणि रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष दत्तात्रय साळवी उपस्थित होते.
