प्राथमिक शाळा खेर्डी चिंचघरी ( सती ) या विद्यालयात दीपोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न

0
4

प्राथमिक शाळा खेर्डी चिंचघरी ( सती ) या विद्यालयात दीपोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न–

सह्याद्री शिक्षण संस्थेच्या प्राथमिक शाळा खेर्डी-चिंचघरी (सती) येथे दीपोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात संपन्न झाला. भारतीय संस्कृतीतील प्रकाश, ज्ञान, मांगल्य आणि सकारात्मकतेचे प्रतीक असलेल्या दीपोत्सवाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, तसेच सण-परंपरांविषयी आदर निर्माण व्हावा, या उद्देशाने विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
दीपोत्सवानिमित्त विद्यालयाचा परिसर आकर्षक पद्धतीने सजविण्यात आला. विद्यार्थ्यांनी तयार केलेले सुंदर व विविधरंगी आकाशकंदील विद्यालय परिसरात लावण्यात आले. आकाशकंदिलांसोबतच आकर्षक उटणे व भेटकार्ड यांचीही सुंदर मांडणी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून तयार केलेल्या आकाशकंदिलांमुळे संपूर्ण विद्यालय परिसर उजळून निघाला.
दीपावलीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या वतीने उटणे व सुंदर भेटकार्ड भेट देण्यात आले. या छोट्याशा प्रेमळ भेटीमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध रंगांच्या रांगोळ्या काढून परिसराची शोभा वाढविली. दीपप्रज्वलन, रांगोळी, आकाशकंदील सजावट तसेच उटणे व भेटकार्डांचे वाटप यामुळे विद्यालयात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. दीपावली या सणांची शास्त्रीय व धार्मिक माहिती शिक्षिका शितल पाटील यांनी दिली . विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक व सुरक्षित पद्धतीने दीपावली साजरी करण्याचा संदेश शाळेचे मुख्याध्यापक श्री सकपाळ सरांनी आपल्या भाषणातून दिला . या कार्यक्रमाचे आयोजन ज्योती चाळके मॅडमनी केले .
विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अरविंद सकपाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका मनिषा कांबळी, रश्मी राजेशिर्के, संदेश सावंत, अपूर्वा शिंदे, विनया नटे, वृषाली राणे, अर्चना देशमुख, ज्योती चाळके, रूपाली खरात ,वर्षा सकपाळ, शितल पाटील, स्वरा भुरण, विजया मौजे, विनोट उदेग, एकनाथ चाळके, अनिता तांबिटकर यांनी या कार्यक्रमासाठ विशेष मेहनत घेतली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here