गावखडी रत्नागिरी जिल्हा परिषद शाळेच्या विविध मागण्यांसाठी भाजप महिला मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना देण्यात वर्षा ढेकणे यांच्या उपस्थितीत देण्यात आले निवेदन
👉🏻रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या विविध मागण्या व शैक्षणिक सुविधांसंदर्भात भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्र चव्हाण साहेब यांची रायगड बंगला, नरिमन पॉईंट, मुंबई येथे भेट घेऊन लेखी निवेदन सादर करण्यात आले.
गावखडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवश्यक सुविधा व विकासकामांसंदर्भातील मागण्या यापूर्वी महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्षा अनघा साळवी यांच्या कडून जिल्हाध्यक्षांकडे मांडण्यात आल्या होत्या. या मागण्यांची दखल घेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी सदर मागण्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्याकडे लेखी स्वरूपात मांडण्यात आल्या.
यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी निवेदन स्वीकारले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा मिळाव्यात आणि शाळेच्या विकासाला चालना मिळावी या उद्देशाने हा पाठपुरावा करण्यात येत आहे.
यावेळी रत्नागिरी नगरपरिषदेच्या नगरसेविका मानसी करमकर आणि सुप्रिया रसाळ उपस्थित होत्या.
