Home महाराष्ट्र दिल्ली येथील महाराष्ट्र सदनमध्ये आंबा महोत्सवाच्या उद्घाटनास उपस्थित राहण्यास पंतप्रधान नरेंद्र नोदी यांची तत्वत्ता मान्यता

दिल्ली येथील महाराष्ट्र सदनमध्ये आंबा महोत्सवाच्या उद्घाटनास उपस्थित राहण्यास पंतप्रधान नरेंद्र नोदी यांची तत्वत्ता मान्यता

0
दिल्ली येथील महाराष्ट्र सदनमध्ये आंबा महोत्सवाच्या उद्घाटनास उपस्थित राहण्यास पंतप्रधान नरेंद्र नोदी यांची तत्वत्ता मान्यता

दिल्ली येथील महाराष्ट्र सदनमध्ये आंबा महोत्सवाच्या उद्घाटनास उपस्थित राहण्यास पंतप्रधान नरेंद्र नोदी यांची तत्वत्ता मान्यता

  • २७ मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांच्या अभिनव संकल्पनेवरून दिल्लीत ३० एप्रिल व १ मे असे दोन दिवस आंबा महोत्सवाचे आयोजन
  • या दोन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
  • दिल्लीकरांना अस्सल देवगड व रत्नागिरी हापूस आंब्याची चव चाखायला मिळणार

नवी दिल्ली :

दिल्लीकरांना लवकर अस्सल देवगड व रत्नागीरी हापूस आंब्याची चव चाखायला मिळणार आहे. २७ मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांच्या अभिनव संकल्पनेच्या मध्यमातून दिल्ली येथे आयोजित करण्यात
येणाऱ्या आंबा महोत्सवाच्या उद्घाटनास उपस्थित राहण्यास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्वता मान्यता दिली आहे. ही अभिनव संकल्पना त्यांना आवडल्यामुळे त्यांनी या महोस्तावाच्या उद्घाटनास येण्याची तयारी दर्शवली आहे. या महोस्तवाचे उद्घाटन पंतप्रधान यांच्या हस्ते व्हावे यासाठी खासदार रविंद्र वायकर यांनी आज (सोमवारी) त्यांची भेट घेऊन आग्रहकपूर्वक निमंत्रण दिले. यावेळी पंतप्रधान यांनी प्रत्येक राज्यातील जिल्ह्यत उत्पादित होणाऱ्या फळांना जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध व्हावी यांसाठी राज्यांनी प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे, असे मत व्यक्त केले.

कोकणातील देवगड व रत्नागिरीतील हापूस आंबा महाराष्ट्रात व देशभरात खूपच प्रसिद्ध आहे. कोकणातील शेतकऱ्याना विविध राज्यांमध्ये थेट बाजारपेठ उपलब्ध व्हावी, त्यांना जास्तीत जास्त नफा मिळावा, आंब्याच्या निर्यातीला अधिक चालना मिळावी, या उदात्त हेतूने खासदार रविंद्र वायकर यांनी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन
मध्ये ३० एप्रिल ते १ मे (महाराष्ट्र दिन) पर्यंत आंबा महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोस्तवामुळे ग्रामीण भागातील उद्योजकांना मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे ही आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्या बरोबरच देशाच्या विविध राज्यातील खासदार व आमदार यांनाही निमंत्रण देण्यात येणार आहे.

या भेटी दरम्यान खासदार वायकर यांनी मुंबईतील पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन गारगाई-पिंजाळ प्रकल्प पूर्ण करण्यात यावी अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली, यावर रेन वाँटर हार्वेस्टिंग प्रकल्पाची जास्तीत जास्त व्याप्ती वाढवण्यावर अधिक भर देण्याची अवश्यकता आहे, असे मत व्यक्त केले. तसेच एम्सच्या धर्तीवर मुंबईत एक रुग्णालय सुरु करण्यात यावे यामध्ये कॅन्सर रुग्णांवर उपचाराची सुविधा करण्यात यावी, अशी विनंती खासदार वायकर यांनी पंतप्रधान यांच्याकडे केली. यावर त्यांनी सकारात्मकता दर्शवली. त्याच बरोबर पी. एम. सी बँकेतील खातेधारकांना लवकरात लवकर दिलासा देण्याबाबत चर्चा करून निवेदन ही खासदार वायकर यांनी पंतप्रधान यांना दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here