…या प्रसंगी प्राचार्य शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.. रत्नागिरी पावस मार्गवर असलेल्या मुकुल माधव विद्यालयात विद्यार्थ्यांना उत्कृष्ट प्रकारे शिक्षण दिले जाते तसेच या ठिकाणी सर्व प्रकारच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध असल्याने पालकांची पहिली पसंती मुकुल माधव विद्यालयाला असल्याचे दिसून आले आहे. या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी उत्तम प्रकारचे मैदान असल्याने विविध प्रकारचे खेळ विद्यार्थ्यांना शिकवले जातात. मुकुल माधव फाउंडेशनच्या मुख्य ट्रस्टी रितू प्रकाश छाब्रीया यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हे विद्यालय सुरू असल्याने या ठिकाणी सर्व प्रकारच्या शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मुकुल माधव विद्यालयालाचा शैक्षणिक दर्जा दरवर्षी उंचावतच जात असल्याचे दिसून आले आहे. मुकुंद माधव विद्यालय हे आज तरी रत्नागिरीतील एक नामांकित विद्यालय असल्याचे दिसून आले आहे..
रत्नागिरी येथील मुकुल माधव विद्यालय येथे महाराष्ट्र दिन आर.टी.ओ. अधिकारी राजश्री पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला
