रत्नागिरीलोकशाही दिन 2 जून रोजी--

लोकशाही दिन 2 जून रोजी–

रत्नागिरी, दि.27 (जिमाका) : जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. माहे जून 2025 चा लोकशाही दिन सोमवार 2 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी 1 ते 2 वाजता या वेळेत होणार आहे.
लोकशाही दिनाकरिता नागरिकांनी प्रथम तालुका लोकशाही दिनात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. तालुका लोकशाही दिनातील उत्तराने समाधान न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्जदार अर्ज सादर करु शकतात, असे प्र. उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी कळविले आहे.

Breaking News