रत्नागिरीस्मार्ट प्रीपेड मीटर विरोधात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने रत्नागिरी येथील महावितरण...

स्मार्ट प्रीपेड मीटर विरोधात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने रत्नागिरी येथील महावितरण कार्यालयावर दिली जोरदार धडक–

➡️ शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज सकाळी शिवसेना नेते तथा माजी खासदार श्री विनायक राऊत तसेच उपनेते तथा माजी आमदार बाळ माने, संपर्कप्रमुख श्री सहदेव बेटकर, जिल्हा प्रमुख श्री दत्ता कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत स्मार्ट प्रीपेड मीटर विरोधात माजी खासदार श्री विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालय ते अधिक्षक अभियंता, महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

या मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक नेते प्रमुख कार्यकर्ते आणि विशेष करून महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.. माजी खासदार विनायक राऊत व माजी आमदार बाळासाहेब माने यांनी महायुती सरकार वर जोरदार टीका केली

Breaking News